शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या राज्यांना पाणी देण्यासारखी नाही कोयना धरणाची स्थिती, केवळ 'इतकाच' पाणीसाठा शिल्लक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 12:04 IST

तांत्रिक वर्ष सुरू झाल्याने कराराप्रमाणे राज्य सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते

कोयनानगर : कोयना धरणातूनपाणी मिळावे, अशी मागणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र, कोयना धरणात केवळ १८ टीएमसी पाणीसाठा असल्याने कोयनेतून कर्नाटकला पाणी देण्यासारखी स्थिती नाही. मात्र, तांत्रिक वर्ष सुरू झाल्याने कराराप्रमाणे राज्य सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते.सध्या कोयनेतून ३,१४० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी सांगली जिल्ह्याच्या मागणीनुसार सिंचनासाठी सोडण्यात आले आहे. मात्र, अतिरिक्त पाणी सोडावे लागल्यास आणि पाऊसकाळ लांबला तर पाण्याची टंचाई जाणवणार आहे.महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यांसाठी वरदायिनी ठरलेल्या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या सन २०२३-२४ च्या तांत्रिक वर्षास १ जूनपासून सुरुवात झाली. ३१ मे रोजी संपलेल्या तांत्रिक वर्षात कोयना जलविद्युत प्रकल्पातून ३३६१.८२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे.कोयना धरणाचे पाणीवाटप कृष्णा लवादानुसार १ जून ते ३१ मे या तांत्रिक वर्षानुसार होत असते. कोयना धरणाची क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. यामधील ६७.५० टीएमसी पाणी वीजनिर्मिती व उर्वरित सिंचनासाठी वापरले जाते. चालू वर्षी ६७.५० टीएमसी पाणी या लवादाच्या आरक्षित पाणीसाठ्याची मर्यादा ओलांडत तब्बल ७१.०९ टीएमसी पाण्याचा वापर पश्चिमेला वीजनिर्मितीसाठी करण्यात आला.सध्या १८.०९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, मृतसाठा ५.१२ टीएमसी वगळता १२.९७ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी निव्वळ पाणीसाठा १६.२० टीएमसी इतका होता. गतवर्षीच्या तांत्रिक वर्षांची तुलना केली असता पाणीसाठा कमी आहे. मात्र, सध्या सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे दीड महिना पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणWaterपाणी