शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कोयनेचे दरवाजे चौथ्यांदा उघडले; १५ हजार क्यूसेकने विसर्ग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 15:12 IST

सततच्या पावसामुळे शेतीची कामेही खोळंबली

सातारा : जिल्ह्याच्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असून, २४ तासात महाबळेश्वर येथे ४७, तर नवजाला ५४ मिलिमीटरची नोंद झाली. त्यामुळे कोयना धरणात १०३.६४ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तसेच धरण भरण्यासाठी दीड टीएमसी पाण्याची गरज असली तरी आवक वाढल्याने धरणाचे दरवाजे चौथ्यांदा उघडून विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे धरणातून एकूण १५ हजार ७०० क्यूसेक विसर्ग होत आहे.जिल्ह्यातील पावसाला तीन महिने पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत तीन महिन्यांच्या सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान कमी झाले आहे. तरीही प्रमुख पाणी प्रकल्प भरत आले आहेत, ही समाधानाची बाब आहे. त्यातच सध्याही पाऊस पडत आहे. पूर्व भागात पावसाची उघडीप असली तरी पश्चिमेकडे चांगलीच हजेरी लागत आहे. कास, तापोळा, बामणोली, काेयनानगर, महाबळेश्वर भागात सततच्या पावसामुळे शेतीची कामेही खोळंबली आहेत.बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात सर्वाधिक पर्जन्यमान नवजा येथे ५४ मिलिमीटर झाले आहे, तर सकाळच्या सुमारास कोयना धरणात १५ हजार २१९ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढून १०३.६२ टीएमसी झाला होता. २४ तासात धरणात सवा टीएमसीहून अधिक पाणी आवक झाली.धरण भरू लागल्याने पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी रात्रीच्या सुमारास कोयनेचे दरवाजे चाैथ्यांदा उघडून विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे पायथा वीजगृह २ हजार १०० आणि दीड फूट दरवाजे उचलून १३ हजार ६०० असा एकूण १५ हजार ७०० क्यूसेक विसर्ग सुरू झाला होता. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.दरम्यान, एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे ४ हजार ३३१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर नवजाला ५ हजार ३७० आणि महाबळेश्वरमध्ये ५ हजार १५३ मिलिमीटरची नोंद झालेली आहे. सातारा शहरात बुधवारी सकाळच्या सुमारास पावसाची उघडीप होती. त्यामुळे नागरिकांना सूर्यदर्शन झाले.