शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: दुष्काळाचे सावट दूर झाले, कोयना धरण ९९ टक्के भरले

By नितीन काळेल | Updated: September 2, 2024 19:02 IST

महाबळेश्वर १९, नवजाला २७ मिलिमीटर पाऊस 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडतच असून २४ तासांत महाबळेश्वरला १९ तर नवजा येथे २७ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयनेतही पाण्याची सावकाश आवक असलीतरी पाणीसाठा १०४ टीएमसीवर गेला. त्यामुळे धरण ९९ टक्के भरले भरले आहे. तसेच इतर धरणेही भरण्याच्या मार्गावर आहेत.जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पाऊस होत आहे. जूनमध्ये चांगला पाऊस झाला. तर जुलैमध्ये अतिवृष्टी झाली होती. यामुळे पश्चिम भागातील तळ गाठलेल्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. सर्वच धरणे ८० टक्क्यांवर भरली. पूर्व भागात मागील वर्षभर दुष्काळ होता. सततच्या पावसामुळे तलाव आणि धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. आॅगस्ट महिन्यातही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. यामुळे दुष्काळाचे सावट दूर झालेले आहे.

पश्चिम भागात मागील १५ दिवसांपासून पाऊस होत आहे. सुरूवातीला जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाचा जोर कमी होत गेला आहे. तरीही धरणे पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहेत. सध्या कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या प्रमुख धरणांत १४६ टीएमसीवर पाणीसाठा गेलेला आहे. त्यातच सध्या पाऊस होत असल्याने धरणात आवक होत आहे. त्यामुळे पाणी विसर्ग करावा लागतोय.सोमवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे २४ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर नवजा येथे २७ आणि महाबळेश्वरला १९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर एक जूनपासून सर्वाधिक पावसाची नोंद नवजा येथे ५ हजार ८९२ मिलीमीटरची झाली. यानंतर महाबळेश्वरला ५ हजार ६७५ आणि कोयनानगर येथे ५ हजार ७१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४ हजार ६०७ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात १०४. ०६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणRainपाऊस