कोयनेचे दरवाजे दुपारपर्यंत अडीच फुटावर जाणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 14:55 IST2017-09-21T14:47:57+5:302017-09-21T14:55:13+5:30
कोयना धरणात पाण्याची आवक सुरूच असून व त्यामध्येच १०५ टीएमसी पाणीसाठा झाल्याने धरण व्यवस्थापनाने पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दरवाजे अडीच फुटापर्यंत उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नदीपात्रात सुमारे २५ हजार क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होणार आहे.

कोयनेचे दरवाजे दुपारपर्यंत अडीच फुटावर जाणार !
सातारा : कोयना धरणात पाण्याची आवक सुरूच असून व त्यामध्येच १०५ टीएमसी पाणीसाठा झाल्याने धरण व्यवस्थापनाने पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दरवाजे अडीच फुटापर्यंत उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नदीपात्रात सुमारे २५ हजार क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होणार आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक सुरू आहे. सध्या धरणात सुमारे २५ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे.
बुधवारपेक्षा गुरूवारी धरणातील साठा वाढला असून तो १०५ टीएमसी इतका झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरुच ठेवण्यात येणार आहे. बुधवारपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
बुधवारी सकाळी धरणाचे सहा दरवाजे एक फुटाने व सायंकाळी दीड फुटाने उघडण्यात आले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास दरवाजे दोन फुटापर्यंत उघडण्यात आले होते. आज गुरूवारी दुपारपर्यंत धरणाचे दरवाजे अडीच फुटाने उचलण्यात येणार आहेत. त्यामुळे पायथा वीजगृह आणि धरणाच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे.
सुमारे २५ हजार क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू राहणार असल्याचे धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.