कोविडमुळे सलग दुसऱ्या वर्षी कर्मवीर पुण्यतिथीचे कार्यक्रम रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:41 IST2021-05-06T04:41:53+5:302021-05-06T04:41:53+5:30

सातारा : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम दरवर्षी ९ मे रोजी विविध उपक्रमांनी ...

Kovid cancels Karmaveer Punyatithi for second year in a row | कोविडमुळे सलग दुसऱ्या वर्षी कर्मवीर पुण्यतिथीचे कार्यक्रम रद्द

कोविडमुळे सलग दुसऱ्या वर्षी कर्मवीर पुण्यतिथीचे कार्यक्रम रद्द

सातारा : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम दरवर्षी ९ मे रोजी विविध उपक्रमांनी होतो. मात्र, कोविडच्या भयावह परिस्थितीमुळे सलग दुसऱ्या वर्षी तो साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी दिली.

त्यांनी सांगितले, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी ९ मे रोजी विविध उपक्रम राबविले जातात. संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची यावेळी विशेष उपस्थिती असते. कोविड १९ मुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता रविवार, ९ मे रोजी होणारा कर्मवीर पुण्यतिथीचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

कर्मवीर पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने ७ व ८ मे राेजी संस्थेच्या वतीने यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स (वायसी काॅलेज) येथे माध्यमिक विभागाकडील शाखाप्रमुख व धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाकडील प्राचार्यांसाठी शैक्षणिक व्याख्यान सत्रांचे आयोजन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत, असेही डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी सांगितले.

Web Title: Kovid cancels Karmaveer Punyatithi for second year in a row