कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा : काशीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:47 IST2021-09-08T04:47:09+5:302021-09-08T04:47:09+5:30

सातारा : कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन राज्यातील सर्व कोतवालांना सरसकट १५ हजार रुपयांचे वेतन देण्यात यावे, या प्रमुख ...

Kotwals should be given the status of Class IV employees: Kashid | कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा : काशीद

कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा : काशीद

सातारा : कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन राज्यातील सर्व कोतवालांना सरसकट १५ हजार रुपयांचे वेतन देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन सातारा जिल्हा कोतवाल संघटनेच्यावतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना देण्यात आले आहे.

फेब्रुवारी २०१९ चा शासननिर्णयबाबत पत्र क्रमांक नुसार वेतनवाढ मिळत नाही. हे पत्रक रद्द करण्यात यावे. कोतवालांना तलाठी महसूल सहाय्यक व तत्सम पदासाठी पन्नास टक्के आरक्षण मंजूर करण्यात यावे, शिपाई संवर्गाच्या सर्व रिक्त जागा कोतवाल संवर्गातून भरण्यात याव्यात, धोरणाने मृत झालेले तसेच मृत वारस अनुकंपा तत्त्वावर सेवेत समाविष्ट करावा, सेवानिवृत्तीनंतर कोतवालास कुठलाही शासकीय लाभ मिळत नसल्याने सेवानिवृत्त कोतवालास सहा लाख रुपये निर्वाह भत्ता देण्यात यावा, आदिवासी या निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत.

सातारा जिल्हा कोतवाल संघटनेचे अध्यक्ष प्रकाश काशीद, जिल्हा संपर्कप्रमुख विशाल भोसले, सुदर्शन चव्हाण, रमेश चले, निवास काटकर, राजेंद्र सावंत, रमेश पाटील, गणेश जाधव, केशव कुंभार आदी पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन सादर केले.

Web Title: Kotwals should be given the status of Class IV employees: Kashid