पोस्टाच्या विशेष पाकिटावर कोरेगावचा ‘वाघ्या घेवडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:39 IST2021-08-15T04:39:43+5:302021-08-15T04:39:43+5:30

वाठार स्टेशन : महाराष्ट्र सर्कल अंतर्गत सातारा डाक विभाग, पुणे क्षेत्र यांचे मार्फत ‘वाघ्या घेवडा’ वर एक विशेष पाकिटाची ...

Koregaon's 'Waghya Ghewda' on special post envelope | पोस्टाच्या विशेष पाकिटावर कोरेगावचा ‘वाघ्या घेवडा’

पोस्टाच्या विशेष पाकिटावर कोरेगावचा ‘वाघ्या घेवडा’

वाठार स्टेशन : महाराष्ट्र सर्कल अंतर्गत सातारा डाक विभाग, पुणे क्षेत्र यांचे मार्फत ‘वाघ्या घेवडा’ वर एक विशेष पाकिटाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे जागतिक मानांकनापाठोपाठ आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे.

देऊर येथील एका विशेष कार्यक्रमामध्ये पुणे क्षेत्राचे जनरल पोस्टमास्तर जी. मधुमिता दास यांच्या हस्ते या पाकिटाचे अनावरण करण्यात आले. वाघ्या घेवडा हा राजमाचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये गुलाबी रंग आणि पट्टे आहेत, जसे की वाघाच्या अंगावर असतात म्हणून याचे नाव वाघ्या घेवडा असे आहे. या व्यतिरिक्त, हे एक पोषक कडधान्य आहे. कमी कॅलरी आणि संतृप्त चरबी आणि अँटीऑक्सिडंट्सनेदेखील समृद्ध आहे. २०१६ मध्ये वाघ्या घेवड्याला ‘जीआय टॅग’ मिळाले आहे.

भारतीय डाक विभागाने या वाघ्या घेवडावर स्पेशल कव्हर प्रसिद्ध केल्याने वाघ्या घेवड्याच्या ‘आंतरराष्ट्रीय स्पेशल कव्हर व तिकीट’ या जागतिक वारसामध्ये समावेश झाला आहे. जिल्ह्यासाठी ही एक अभिमानास्पद व गौरवास्पद बाब आहे. या कार्यक्रमासाठी पोस्टमास्तर जनरल पुणे क्षेत्र जी. मधुमिता दासजी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जय तुळजाभवानी शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष मधुकर कदम उपस्थित होते. सातारा डाक विभागाच्या प्रवर अधीक्षिका अपराजिता म्रिधा यांनी वाघ्या घेवडा स्पेशल कव्हर देऊन या ठिकाणी त्याच्या प्रत्यक्ष भौगोलिक स्थानावर प्रसिद्ध करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

१४वाठारस्टेशन

सातारा पोस्ट विभागाकडून वाघा घेवडावर विशेष पाकिट तयार केले. याचे अनावरण पुणे क्षेत्राचे जनरल पोस्टमास्तर जी. मधुमिता दास यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Koregaon's 'Waghya Ghewda' on special post envelope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.