शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

CoronaVirsu Satara Updates-जिल्ह्यात कोरानामुळे आणखी सातजणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 19:41 IST

CoronaVirsu Satara Updates- सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गत चोवीत तासात नवे ५१४ रुग्ण आढळून आले असून, यामध्ये सातजणांचा बळी गेला आहे. यामुळे बळींची संख्या १ हजार ९३१ इतकी झाली असून, बाधितांचा आकडा ६९ वर पोहोचला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात कोरानामुळे आणखी सातजणांचा बळी नवे ५१४ रुग्ण; बाधितांची संख्या ६९ वर

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गत चोवीत तासात नवे ५१४ रुग्ण आढळून आले असून, यामध्ये सातजणांचा बळी गेला आहे. यामुळे बळींची संख्या १ हजार ९३१ इतकी झाली असून, बाधितांचा आकडा ६९ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा कहर सुरू झाल्याने जिल्हावासियांसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. जिल्ह्यात रुग्ण वाढू लागल्याने प्रशासनावरचा ताण वाढू लागला आहे. मंगळवारी जिल्ह्यामध्ये १ हजार १०४ स्वॅबची तपासणी करण्यात आली. यामध्ये ५१४ जण बाधित आढळून आले. यामध्ये सातजणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये साताऱ्यातील सदर बझारमधील ८२ वर्षीय महिला, कोडोली, ता. सातारा येथील ७२ वर्षीय पुरुष, विखळे, ता. कोरेगाव येथील ६७ वर्षीय पुरुष, नित्रळ, ता. कोरेगाव येथील ७२ वर्षीय पुरुष, भुइज, ता. वाइ येथील ५३ वर्षीय पुरुष, ललगुण, ता. खटाव येथील ५५ वर्षीय आणि साताऱ्यातील ७४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने प्रशासनाची धावपळ सुरु झाली आहे. बंद पडलेली कोरोना सेंटर पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याने नातेवाइकांची घालमेल होत आहे. गत वर्षीसारखी यंदाही परिसैथती झाली असून, प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. गत काही दिवसांपूर्वी दिवसाला आठ हजार जणांना लस दिली जात होती. मात्र, आता हा वेग वाढविण्यात आला असून, दिवसाला तब्बल २१ हजार जणांना लस दिली जात आहे. हा लसीचा वेग आणखी वाढविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. जिल्ह्यात आत्तापर्यंत ६१ हजार ७४० जण कोरोनातून मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या ५ हजार ५६२ कोरोना बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. मास्क न लावणाऱ्या तब्बल १२ हजार जणांवर कारवाइजिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यानंतर प्रशासनाने कडक नियम अवलंबले. जिल्ह्यात गत दीड महिन्यात मास्क न घालणाऱ्या तब्बल १२ हजार जणांवर दंडात्मक कारवाइ करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली. अशाप्रकारची कारवाइ सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करून बन्सल म्हणाले, वाइ तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रेला जमलेला जनसुमदायाची खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. जे दोषी आढळलतील त्यांच्यावर नक्कीच कारवाइ करण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर