कोपर्डे हवेलीत कृषी महोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:13 IST2021-02-05T09:13:47+5:302021-02-05T09:13:47+5:30
तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, विभागीय कृषी अधिकारी दौलतराव चव्हाण, सैदापूरचे मंडल अधिकारी विनायक कदम, कालवडचे शेती शास्त्रज्ञ निलेश ...

कोपर्डे हवेलीत कृषी महोत्सव उत्साहात
तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, विभागीय कृषी अधिकारी दौलतराव चव्हाण, सैदापूरचे मंडल अधिकारी विनायक कदम, कालवडचे शेती शास्त्रज्ञ निलेश थोरात, कृषी सहायक संजय जाधव यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
दरवर्षी कृषी सप्ताह साजरा करण्यात येत असतो. यावेळी स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित शाखा कोपर्डे हवेली यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या सेंद्रिय भाजीपाल्यासह वेगवेगळ्या सेंद्रीय खाद्य वस्तूंचे स्टॉल उभारले होते. तर नजीकच असणाऱ्या सेंद्रिय शेतीत कसा भाजीपाला घेतला जातो, याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी रियाज मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. पंधरा गुंठे क्षेत्रावर भरत चव्हाण यांनी वेगवेगळ्या प्रकारचा सेंद्रिय भाजीपाला केला आहे. त्याला अनेक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या.
शेती प्रदर्शनात ३२ स्टॉल उभारण्यात आले होते. त्यामध्ये सेंद्रिय गूळ, सेंद्रिय भाजीपाला, कोबी, मिरची, केळी, चटणी, पापड, बिस्किटे, मातीची भांडी, देवांच्या मूर्ती, आयुर्वेदिक औषधे आदींचा समावेश होता. यावेळी भाजीपाल्यासह इतर वस्तूंची अनेकांनी खरेदी केली. तसेच पाळीव प्राण्यांचे वेगळे स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये बैल, गायी, घोडा, शेळी, श्वान, कोंबडी आदींचा समावेश होता. सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत सुरू असलेल्या कार्यक्रमाची व्यवस्था सेवेकरी आणि कोपर्डे हवेलीसह परिसरातील ग्रामस्थांनी केली.
फोटो : ०१केआरडी०२
कॅप्शन : कोपर्डे हवेली, ता. कऱ्हाड येथे स्वामी समर्थ सेवा केंद्राच्यावतीने आयोजित कृषी महोत्सवावेळी सेंद्रिय भाजीपाला क्षेत्राची पाहणी करून कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली.