कोपर्डे हवेलीत बॅनरविना निवडणूक!

By Admin | Updated: October 16, 2015 00:56 IST2015-10-15T22:58:16+5:302015-10-16T00:56:40+5:30

ग्रामस्थांचे प्रयत्न : वादविवाद टाळण्यासाठी होणार मदत

Koparde Haveli Bannarvina Election! | कोपर्डे हवेलीत बॅनरविना निवडणूक!

कोपर्डे हवेलीत बॅनरविना निवडणूक!

कोपर्डे हवेली : येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवार, दि. १३ पासून सुरुवात झाली. अर्ज दाखल करण्यासाठी सध्या इच्छुकांची गडबड सुरू असल्याचे दिसते. दरम्यान, ही निवडणूक बॅनरविरहीत व्हावी, यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत.कोपर्डे हवेली गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. या गावात निवडणूक कोणतीही असली तरी ग्रामस्थ उत्साहाने निवडणुकीत सहभागी होतात. याठिकाणी गटा तटाचे राजकारण असते. मतदारांची बेरीज करण्यासाठी प्रत्येकजण अतिशय सक्रिय काम करतो. निवडणूक जाहीर झाल्यापासून दोन्ही गट अतिशय कटाक्षाने काम करीत असतात. निवडणुकीनंतर ग्रामस्थ हेवेदावे विसरुन जातात. येथील निवडणूका चुरशीच्या होतात; पण गावची एकी परिसरात चर्चीली जाते. सध्याची ग्रामपंचायत निवडणूक बॅनरविना व्हावी, अशी ग्रामस्थांची इच्छा आहे. त्यासाठी प्रयत्नही केले जात आहेत. जेवढी उमेदवारांची संख्या जास्त तेवढी बॅनरची संख्याही जास्त असते. मोक्याच्या जागेवर बॅनर लावण्याची उमेदवारांसह कार्यकर्त्यांची स्पर्धा लागते. त्यातून वाद विवादाचे प्रसंग निर्माण होतात. त्यामुळे गावाच्या ऐक्याला गालबोट लागते. बॅनर फाडण्याचे प्रकर झाले तर त्यातून तणाव निर्माण होतो. त्यामुळे दोन्ही गटातील उमेदवारांसह त्यांच्या नेत्यांनी बॅनरला फाटा देऊन निवडणूक पार पाडावी, अशी ग्रामस्थांची इच्छा आहे. घरोघरी जाऊन मतदारांच्यापर्यंत विकास कार्यक्रम तसेच उमेदवारांच्या चिन्हांचा प्रचार करता येतो. निवडणूका येतात, जातात; पण संबंध कायम राहतात. त्यासाठी प्रत्येकाने विचार करण्याची गरज असल्याचे ज्येष्ठ ग्रामस्थांचे मत आहे. गत दोन महिन्यांपूर्वी सैदापूर ग्रामपंचायतीची निवडणूक बॅनर तसेच स्पिकरविना पार पाडण्याचा निर्णय झाला होता. त्यांनी तो आमलात आणला होता. त्याचा आदर्श कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये घेतला जाणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Koparde Haveli Bannarvina Election!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.