कोलवडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:41 IST2021-01-13T05:41:27+5:302021-01-13T05:41:27+5:30
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्याया महत्त्वपूर्ण असलेल्या कोलवडी गावातील तरुण युवकांनी आणि ग्रामस्थांनी गावच्या विकासाला प्राधान्य देत गावची ...

कोलवडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्याया महत्त्वपूर्ण असलेल्या कोलवडी गावातील तरुण युवकांनी आणि ग्रामस्थांनी गावच्या विकासाला प्राधान्य देत गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा इतिहास घडवला.
गावच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व देत निवडणूक बिनविरोध करण्याबाबत राष्ट्रवादीचे कल्याण भोसले, सुनील भोसले यांनी ग्रामस्थांना केलेल्या आव्हानास ग्रामस्थांनी योग्य प्रतिसाद दिला.
आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकूण सात जागांपैकी शशिकांत भोसले, शिवाजी भोसले, संध्या भोसले, स्वप्निल चव्हाण, माया चव्हाण यांची निवड बिनविरोध झाली तर विरोधातील दोन सदस्य बिनविरोध निवडण्यात आले. या निवडीबद्दल नवोदित सदस्यांचे आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा बँक संचालक नितीन पाटील, जिल्हा परिषद सदस्य डॉ. अभय तावरे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शिवाजी महाडिक, नरसिंग दिसले यांनी कौतुक केले.