कातरखटाव येथे पोलिसावर चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 12:46 IST2017-09-16T12:44:52+5:302017-09-16T12:46:04+5:30

कातरखटाव येथे पोलिसावर चाकू हल्ला
सातारा : तक्रारीची शहानिशा करण्यासाठी गेलेल्या हवालदारावरच एकाने चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना कातरखटाव, ता. खटाव येथे शुक्रवारी दुपारी घडली. पोलिसांनी काही तासांत हल्ला करणाºयाला अटक केली.
धनाजी वायदंडे असे जखमी हवालदाराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, हवालदार धनाजी वायदंडे हे कात्रेश्वर बीटचे काम पाहतात. कात्रेश्वर येथील वाढत्या तक्रारीची दखल घेऊन वायदंडे हे संबंधित वस्तीवर गेले होते. ‘यापुढे तुमच्या तक्रारी आल्या नाहीत पाहिजेत,’ असे ते सांगत असतानाच मोहन काळे याने हवालदार धनाजी वायदंडे यांच्यावर पाठीमागून चाकू हल्ला केला.
यामध्ये गायकवाड गंभीर जखमी झाले. या प्रकारानंतर मोहन काळे तेथून पसार झाला. इतर पोलिसांनी जखमी गायकवाड यांना तत्काळ वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
या प्रकाराची माहिती वडूज पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी कात्रेश्वर येथील वस्तीवर छापा टाकून मोहन काळेला ताब्यात घेतले.