‘किसन वीर’ने संतपरंपरा जोपासली : पुरंदर
By Admin | Updated: January 23, 2015 23:40 IST2015-01-23T20:21:42+5:302015-01-23T23:40:22+5:30
अखंड नामयज्ञ सोहळा : ग्रंथदिंडीने प्रारंभ; ग्यानबा तुकारामाच्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमलो

‘किसन वीर’ने संतपरंपरा जोपासली : पुरंदर
भुर्इंज : ‘मदन भोसले यांच्या नेतृत्व आणि कर्तृत्वातून किसन वीर साखर कारखान्याचे नंदनवन झाले आहे. इथल्या सहकाराला अखंडनाम यज्ञ सोहळ्याच्या माध्यमातून अध्यात्माची जोड देत त्यांनी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, ज्ञानेश्वर माउली आणि तुकोबारायांची संत परंपरा जोपासली आहे,’ असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.
किसन वीर साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित बाराव्या अखंड नामयज्ञ सोहळ्याचे उद्घाटन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले, कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, खंडाळा साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, शिवाजीराव वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुरंदरे म्हणाले, ‘अध्यात्म आणि सहकार हाच सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू आहे. दोन्ही विचार समाजात रुजले, वाढले पाहिजेत. प्रताप देशमुख यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत उदावंत यांनी सूत्रसंचालन केले. अनिल जोशी यांनी आभार मानले. यानिमित्ताने ग्रंथविक्री स्टॉलचे उद्घाटन बाबासाहेब पुरंदरेयांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी सकाळी ज्ञानेश्वर माउली आणि ग्यानबा तुकारामांचा जयघोष, शिंग-तुतारी व टाळ मृदुगांचा गजर, वारकरी व कारखाना परिसरातील शाळांमधून आलेल्या बालसंतांच्या अभूतपूर्व उत्साहात ग्रंथदिंडी काढण्यात
आली. (वार्ताहर)