सातारा : मुंबई मराठा मोर्चाकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठ फिरविल्यानंतर त्यांच्या समर्थकांमधूनच वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाहीरपणे व्यक्त होऊ लागल्या आहेत. ‘राजे.. तुम्ही यायलाच हवं होतं !’ अशा भाषेत अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून ‘राजकीय नेत्यांना या मोर्चात संतप्त भावनांना सामोरं जावं लागणार, हे माहीत असल्यानंच आमच्या राजेंनी हा निर्णय घेतला,’ असंही समर्थन अनेकांनी केलं.
नाशिक येथील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर साताºयाचे उदयनराजे अन् कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती या मोर्चाचं नेतृत्व करतील, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. उदयनराजे यांच्या वेगळ्या स्टाईलची महाराष्ट्रातील तरुणवर्गाला क्रेझ असल्यानं बुधवारच्या मुंबई मराठा मोर्चात त्यांच्या एन्ट्रीकडं साºयांचंच लक्ष लागून राहिलं होतं.
उदयनराजे मुंबईतील क्रांती मोर्चाला जाणारच, हे गृहीत धरून बंदोबस्तासाठी खास साताºयावरुन पोलिस पथक पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी गेलं होतं. मात्र, ऐनवेळी त्यांनी या पथकाला परत पाठवून देऊन ते स्वत: मात्र पुण्यातच थांबल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, महाराष्ट्रातील बहुतांश नेते या मोर्चात सहभागी झालेले असतानाही केवळ उदयनराजे हेच मोर्चात न दिसल्यानं आपापल्या गावी परत निघालेल्या मोर्चेकºयांमध्ये हा विषय भलताच चर्चेचा ठरला होता.
कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती अन् साताºयाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आझाद मैदानावर शेवटपर्यंत बसून होते. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेवेळीही या दोघांची मंत्रालयातील एन्ट्री अनेकांनी पाहिली. म्हणे मोदींनी केली होती विनंती !
उदयनराजे यांचे खास समर्थक असलेल्या साताºयातील राजू गोडसे यांनी बुधवारी रात्री याबाबत एक निवेदनवजा पोस्ट फेसबुकवर टाकली होती. यात त्यांनी म्हटलं होतं की, ‘मोर्चातील तरुणांचा उत्साह पाहता शांतता राखली जावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:हून उदयनराजेंना मोर्चात न जाण्याची विनंती केल्यामुळेच राजे यात सहभागी झाले नाहीत.’
ही पोस्ट फिरु लागताच संमिश्र भावनांच्या प्रतिक्रिया धडाधड व्यक्त होऊ लागल्या. ‘पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांना धन्यवाद. त्यांना जनतेची काळजी आहे वाटतं,’ अशा शब्दात एका जाणकारानं खोचक मत व्यक्त केलं, तर बहुतांश समर्थकांनी, कारण काहीही असो... राजे, तुम्ही मोर्चात यायलाच हवं होतं,’ अशी आर्त साद दिल्याचंही सोशल मीडियावर दिसून आलं.
काहीजणांनी तर या पोस्टला चक्क ‘जोक’ असं म्हणत आपली भावना व्यक्त केली. दरम्यान, राजे न येण्याच्या कारणाबाबत तिखट प्रतिक्रिया पडू लागताच मध्यरात्री ही पोस्ट अकस्मातपणे गायब झाली. उदयनराजेंचे खास समर्थक म्हणून ओळखल्या जाणाºया राजू गोडसे यांच्या पत्नी दीपाली गोडसे या उदयनराजे गटाकडून साताºयाच्या उपनगराध्यक्षा होत्या.