सव्वा महिन्याच्या बालकाचे अपहरण

By Admin | Updated: September 7, 2014 00:09 IST2014-09-07T00:02:31+5:302014-09-07T00:09:49+5:30

फलटण : विडणी, ता. फलटण येथे भरवस्तीतील घरातून अज्ञाताने सव्वा महिन्याच्या बालकाचे अपहरण केल्याची

Kidnapping of twelfth month | सव्वा महिन्याच्या बालकाचे अपहरण

सव्वा महिन्याच्या बालकाचे अपहरण

फलटण : विडणी, ता. फलटण येथे भरवस्तीतील घरातून अज्ञाताने सव्वा महिन्याच्या बालकाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी गिरिराज जगताप (रा. बौद्धनगर, विडणी) यांची मुलगी सुप्रिया अमित मोरे (वय २०, रा. जंक्शन, वालचंदनगर, ता. इंदापूर) ही प्रसूतीसाठी दोन महिन्यांपूर्वी माहेरी विडणीत आली आहे. एक महिना सहा दिवसांपूर्वी सुप्रिया मोरे यांनी एका मुलाला जन्म दिला.
सुप्रिया मोरे आज, शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास मुलाला घरात अंथरुणावर ठेवून घरासमोर असलेल्या स्वच्छतागृहात गेल्या. त्यावेळी घरात लहानग्याशिवाय कोणीही नव्हते. काही वेळात त्या परत आल्या, त्यावेळी त्यांना बाळ जागेवर नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर कोणीतरी येऊन बाळाला घेतले असेल, अशा समजुतीने त्यांनी घरात व आसपास मुलाची चौकशी केली; तथापि मूल सापडत नसल्याने परिसरातील लोकांच्या मदतीने शेजारच्या झाडाझुडपात व परिसरात शोध घेतला. मात्र, शोध लागला नाही. त्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Kidnapping of twelfth month