ऊसतोड मजूर महिलेच्या बहिणीचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:14 IST2021-03-04T05:14:26+5:302021-03-04T05:14:26+5:30

सातारा : एका परप्रांतीय ऊसतोड मजूर महिलेच्या अल्पवयीन बहिणीचे अपहरण झाले असल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिच्या ...

Kidnapping of the sister of a sugarcane worker | ऊसतोड मजूर महिलेच्या बहिणीचे अपहरण

ऊसतोड मजूर महिलेच्या बहिणीचे अपहरण

सातारा : एका परप्रांतीय ऊसतोड मजूर महिलेच्या अल्पवयीन बहिणीचे अपहरण झाले असल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिच्या बहिणीने दाखल केली आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मर्ढे येथील सुरेश वामन शिंगटे यांच्या शेतामध्ये रेखाबाई बाळू बारेला (वय १९, मूळ रा. पिंपळखोरा, ता. जि. बुरहानपूर, राज्य - मध्य प्रदेश. सध्या रा. मर्ढे, ता. सातारा) ही ऊसतोडणीचे काम करीत होती. यावेळी तिच्यासमवेत तिची बहीणही होती. मात्र, सोमवारी (दि. १) तिच्या बहिणीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस नाईक कुंभार करीत आहेत.

Web Title: Kidnapping of the sister of a sugarcane worker