शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

खुंटेवस्ती येथे शेडमध्ये ५९ जनावरे क्रुरतेने ठेवली डांबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 19:24 IST

एका छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये तब्बल ५९ जनावरांना दाटीवाटीने पाय बांधून क्रुरतेने डांबून ठेवल्याची घटना खुंटेवस्ती, ता. फलटण येथे शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. या सर्व जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेने सुटका केली असून, याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

ठळक मुद्देखुंटेवस्ती येथे शेडमध्ये ५९ जनावरे क्रुरतेने ठेवली डांबूनस्थानिक गुन्हे शाखेकडून सुटका : तिघांना अटक

सातारा : एका छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये तब्बल ५९ जनावरांना दाटीवाटीने पाय बांधून क्रुरतेने डांबून ठेवल्याची घटना खुंटेवस्ती, ता. फलटण येथे शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. या सर्व जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेने सुटका केली असून, याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.शाहरूख जलील कुरेशी (वय २७), सुहेल जलील कुरेशी (वय २०, रा. मंगळवार पेठ, फलटण), राजू हुसेन शेख (वय १८, रा. निरावाघज, ता. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, खुंटेवस्ती, ता. फलटण येथे ओढ्यालगत एक पत्र्याचे शेड असून, या शेडमध्ये बेकायदा जिवंत गायी, वासरे, बैल क्रुरतेने बांधलेले आहेत. त्यांची कत्तल करण्यासाठी वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचा आदेश दिला.एलसीबीची टीम शनिवारी दुपारी खुंटेवस्ती येथे पोहोचल्यानंतर एका छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये दाटीवाटीने जनावरे पाय बांधलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आली. त्यामध्ये ५३ वासरे, २ बैल, ४ गायींचा समावेश होता. या जनावरांची त्या छोट्याशा शेडमधून पोलिसांनी सुटका केली.

ही सर्व जणावरे झीरपवाडी, ता. फलटण येथील सद्गुरू गोशाळेत संगोपणासाठी पाठविण्यात आली आहेत. या ठिकाणी पोलिसांना १ आयशर टेम्पो, १ पिकअप टेम्पोही सापडला. टेम्पोमध्येही जनावरे पोलिसांना सापडली. ही दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली असून, वरील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार घोरपडे, विलास नागे, जोतीराम बर्गे, उत्तम दबडे, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, रवींद्र वाघमारे, संतोष जाधव, प्रवीण कडव, केतन शिंदे, धीरज महाडिक आदींनी ही कारवाई केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस