खोडजाईवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST2021-01-08T06:04:16+5:302021-01-08T06:04:16+5:30

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केल्यापासून गावोगावी निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली. कऱ्हाड उत्तर मतदारसंघातील खोडजाईवाडी येथील ग्रामस्थांनी ...

Khodjaiwadi Gram Panchayat election unopposed | खोडजाईवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध

खोडजाईवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केल्यापासून गावोगावी निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली. कऱ्हाड उत्तर मतदारसंघातील खोडजाईवाडी येथील ग्रामस्थांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल केलेल्या सर्व पाच अर्जांच्या जागांवर एकमताने सागर सुभाष गोडसे, राजेंद्र दाजीराम मांडवे, विमल धर्मेंद्र पवार, संजीवनी हणमंत कोकाटे, अंजना दत्तात्रय मांडवे यांची बिनविरोध निवड केली.

बिनविरोध निवड झालेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा कऱ्हाडमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी आयुक्त तानाजीराव साळुंखे, माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे, डॉ. विजय साळुंखे, रामचंद्र साळुंखे, सुभाष साळुंखे, सुनील साळुंखे, रामराव साळुंखे, शिवाजीराव साळुंखे, सुहास साळुंखे, कैलास साळुंखे, निरंजन साळुंखे आदी उपस्थित होते.

फोटो : ०५केआरडी०२

कॅप्शन : खोडजाईवाडी, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

Web Title: Khodjaiwadi Gram Panchayat election unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.