राष्ट्रवादीच्या माध्यमातून खटाव तालुका उत्तर भागातील विकासकामे करणार : पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:48 IST2021-07-07T04:48:31+5:302021-07-07T04:48:31+5:30
पुसेगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुसेगावसह खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील लोकहिताच्या कामांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही सारंग पाटील ...

राष्ट्रवादीच्या माध्यमातून खटाव तालुका उत्तर भागातील विकासकामे करणार : पाटील
पुसेगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुसेगावसह खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील लोकहिताच्या कामांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही सारंग पाटील यांनी दिली.
पुसेगाव ग्रामपंचायतीस सारंग पाटील यांची सोमवारी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, पंचायत समिती सदस्य संतोष साळुंखे, सरपंच विजय मसणे, उपसरपंच पृथ्वीराज जाधव, ग्रामविकास अधिकारी काझी, ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराव जाधव, मधुकर टिळेकर, सुरेशशेठ जाधव, संतोष तारळकर, विशाल जाधव, गणेश जाधव, सत्यम जाधव, सोहराब शिकलगार, सूरज जाधव, अजय जाधव, संजय जाधव, गणेश मदने उपस्थित होते.
खासदार श्रीनिवास पाटील यांचा सातारा लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुके व गावे यांच्या विकासकामांचा आढावा व प्रत्यक्ष प्रस्तावित विकासकामांची पाहणी, तसेच अडीअडचणी व समस्या जाणून घेऊन त्याप्रमाणे पुढील कार्यवाहीसाठी मतदारसंघात दौरा सुरू आहे. यावेळी पाटील यांनी पुसेगावमधील विविध सार्वजनिक प्रश्न, विकासकामे याबाबत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी चर्चा केली. पुसेगावमधील लोकहिताच्या कामासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची त्यांनी ग्वाही दिली.
गावातील रस्ते, जुन्या बुधरोड वरील धोकादायक पूल, गोरे वस्ती येथील विद्युत ट्रान्सफार्मर अशा विकासकामांसाठी तत्काळ कार्यवाही करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी उत्तर खटाव तालुक्यातील सर्व विकासकामे करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही दिली. सरपंच विजय मसणे, उपसरपंच पृथ्वीराज जाधव व ग्रामपंचायत सदस्यांनी विविध विकासकामांची मागणी करणारे निवेदन यावेळी पाटील यांना दिले. या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुसेगाव शहरप्रमुख राम जाधव यांनी आभार मानले.
०५पुसेगाव
पुसेगाव ग्रामपंचायतीत मार्गदर्शन करताना सारंग पाटील. त्यावेळी प्रदीप विधाते, सरपंच विजय मसणे, सुरेशशेठ जाधव उपस्थित होते.