खरिपाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:34 IST2021-05-03T04:34:17+5:302021-05-03T04:34:17+5:30
कोपर्डे हवेली : परिसरात रब्बी हंगामानंतर रिकाम्या झालेल्या शेतांच्या मशागतीच्या कामात शेतकरी मग्न आहेत. परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात ...

खरिपाची तयारी
कोपर्डे हवेली : परिसरात रब्बी हंगामानंतर रिकाम्या झालेल्या शेतांच्या मशागतीच्या कामात शेतकरी मग्न आहेत. परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांनी उसाचा खोडवा गेल्यानंतर शेतीची नांगरटीची कामे सुरू केली आहेत. शाळू पिकाची काढणीही अंतिम टप्प्यात आली आहे. जून महिन्यात पेरणी किंवा उसाची लावण करणाऱ्यांसाठी शेतांच्या मशागतीची कामे करण्यात परिसरातील शेतकरी व्यस्त आहेत.
झाडांची देखभाल
पाटण : सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून मोरगिरी ते नाटोशी रस्त्यानजीक लावलेल्या झाडांची देखभाल करण्याचे काम गतीने सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. या रस्त्यालगत लावण्यात आलेल्या झाडांना पाणी देणे, आजूबाजूचे गवत काढणे, झाडांना खड्डे काढण्याचे काम केले जात आहे. या कामामुळे झाडांची वाढ चांगली झाली आहे.
नाल्यांची दुर्दशा
मलकापूर : कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या दुतर्फा बांधलेल्या आरसीसी नाल्यांची देखभाल दुुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. याचे सर्वाधिकार याच विभागाकडे आहेत. मात्र, नाले निर्मितीपासून एकदाही या नाल्यांची साफसफाई केलेली नाही. त्यामुळे या परिसरात अनेक ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.