लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी खंडू इंगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:47 IST2021-07-07T04:47:46+5:302021-07-07T04:47:46+5:30
कऱ्हाड : लायन्स क्लब ऑफ कऱ्हाडच्या २०२१-२२ या वर्षासाठी अध्यक्षपदी खंडू इंगळे यांची निवड करण्यात आली आहे. ...

लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी खंडू इंगळे
कऱ्हाड : लायन्स क्लब ऑफ कऱ्हाडच्या २०२१-२२ या वर्षासाठी अध्यक्षपदी खंडू इंगळे यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदी संजय पवार तर खजिनदार म्हणून मिलिंद भंडारे यांची निवड करण्यात आली आहे.
खंडू इंगळे हे गेले १५ वर्षांहून अधिक काळ पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या माध्यमातून अनेक सामाजिक विषयावरील निर्भीड लिखाण करत परिणामकारक असे समाजातील आवश्यक ते बदल होण्यास त्यातून मदतदेखील झाली आहे. मिलिंद भांडारे हे वर्तमानपत्र वितरण व्यवसायातील शहरातील सुपरिचित व्यक्तिमत्त्व आहे त्यांनी तब्बल दोन दशकांहून अधिक काळ या व्यवसायात आपले योगदान देत आपली बांधिलकी जपली आहे. संजय पवार हे गेल्या ८ ते १० वर्षांपासून लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्यात शहर व परिसरातून अग्रेसर आहेत. लायन्स क्लब आॅफ कराडला सुमारे ५४ वर्षांची परंपरा असून कराड व परिसरात या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून विविध समाजकार्य केले जाते. या संस्थेचे लायन्स आय हाॅस्पिटलसह एकूण १८ कायमस्वरूपी प्रकल्प कराड शहर परिसरात आजही कार्यरत आहेत. या माध्यमातून परिसरात मोठे सेवाभावी काम चालू आहे. या निवडीबद्दल खंडू इंगळे, संजय पवार व मिलिंद भंडारे यांचा सत्कार करण्यात आला.
फोटो
खंडू इंगळे
संजय पवार
मिलिंद भंडारे