आरोग्यसेवेत खंडाळा अव्वल
By Admin | Updated: July 23, 2014 22:32 IST2014-07-23T22:17:30+5:302014-07-23T22:32:04+5:30
जिल्हा परिषदेचे पुरस्कार : तालुुक्यातील आरोग्य केंद्रांचा गौरव

आरोग्यसेवेत खंडाळा अव्वल
शिरवळ : सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ट कार्याबद्दल खंडाळा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये शिरवळ, लोणंद, अहिरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
जागतिक लोकसंख्या दिन व जागतिक मातृत्व दिनानिमित्त जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचारी व आरोग्य केंद्रांना जिल्हा परिषदेमार्फत पुरस्कार देण्यात आले.
यामध्ये शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रसूतीमध्ये जिल्ह्यात प्रथम, कुटुंबकल्याण शस्त्रक्रियामध्ये जिल्ह्यात प्रथम, लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्र, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, उत्कृष्ट कार्य, वैयक्तिक पुरस्कार, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, नायगाव आरोग्यसेवक किशोर सानप, आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी उत्कृष्ट कार्याबद्दल पळशी आरोग्य उपकेंद्र आशा स्वयंसेविका शोभा मोरे, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया उत्कृष्ट कार्य अहिरे प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्यसेवक महेश कुंभार या कर्मचाऱ्यांचा पुरस्कारामध्ये समावेश आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर, कृषी सभापती किरण साबळे-पाटील, संजय देसाई, डॉ. शैला दाभोलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, प्रा. श्रीधर साळुंखे, जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. कांबळे, जिल्हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. भालेराव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)