खंडाळ्यातील शिक्षकांचे प्रश्न दोन महिन्यांत मार्गी लावणार : सुजाता जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:39 IST2021-08-15T04:39:35+5:302021-08-15T04:39:35+5:30
खंडाळा : ‘खंडाळा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे काम उल्लेखनीय आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी म्हणून तालुक्याची शैक्षणिक ओळख आहे. ...

खंडाळ्यातील शिक्षकांचे प्रश्न दोन महिन्यांत मार्गी लावणार : सुजाता जाधव
खंडाळा : ‘खंडाळा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे काम उल्लेखनीय आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी म्हणून तालुक्याची शैक्षणिक ओळख आहे. तालुक्याचा हा नावलौकिक राखण्यासाठी शिक्षक वर्ग प्रयत्नशील असतो. त्यामुळे तालुका स्तरावर रखडलेले सर्व विषय दोन महिन्यांत मार्गी लावू,’ असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी सुजाता जाधव यांनी खंडाळा तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिले.
माजी शिक्षक आमदार शिवाजीराव पाटील प्रणित खंडाळा तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडाळाने गटशिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करून तालुक्यातील शिक्षकांचे विविध प्रश्न मांडले. यामध्ये सेवा पुस्तके अद्ययावत करणे व ऑनलाइन करणे, परिविक्षाधीन कालावधी उठवणे, मराठी-हिंदी भाषा विषय सूट मिळण्याबाबत आदेश करणे, गोपनीय अहवाल मिळणे, वैद्यकीय बिले व फंडांची बिले त्वरित मिळणे, शिष्यवृत्ती परीक्षेबाबत, इन्कम टॅक्सबाबत, तालुका आदर्श पुरस्कार प्रस्ताव मागवणे, दुर्गम शाळा निश्चित्ती याबाबत विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष मच्छींद्र ढमाळ, केंद्रप्रमुख दशरथ धायगुडे, तालुकाध्यक्ष नवनाथ क्षीरसागर, सरचिटणीस दत्तात्रय साळुंखे, रामदास सोळसकर, राजीव जाधव, देविदास साळुंखे, राजेश जगताप, नानासाहेब शेडगे, उपाध्यक्ष प्रकाश यादव, प्रसिद्धी प्रमुख श्रीकृष्ण यादव, मंगेश ढमाळ उपस्थित होते.
...................................