खंडाळा तालुकाध्यक्षपदी प्रा. एस. वाय. पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:10 IST2021-03-13T05:10:59+5:302021-03-13T05:10:59+5:30

खंडाळा : खंडाळा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रा. एस. वाय. पवार यांची निवड झाली आहे. तालुका काँग्रेसला नवीन कारभारी मिळाल्याने ...

Khandala taluka president as Pvt. S. Y. Pawar | खंडाळा तालुकाध्यक्षपदी प्रा. एस. वाय. पवार

खंडाळा तालुकाध्यक्षपदी प्रा. एस. वाय. पवार

खंडाळा : खंडाळा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रा. एस. वाय. पवार यांची निवड झाली आहे. तालुका काँग्रेसला नवीन कारभारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. पवार यांच्या निवडीमुळे काँग्रेसला ऊर्जितावस्था प्राप्त होणार आहे.

प्रा. एस. वाय. पवार यांना निवडीचे पत्र जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी बाळासाहेब बागवान, अजित पाटील-चिखलीकर, रजनी पवार, कार्यकारी अध्यक्ष विजयराव कणसे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत ढमाळ, उपसभापती वंदना धायगुडे-पाटील, धनश्री महाडिक, सर्फराज बागवान, रत्नकांत भोसले आदी उपस्थित होते.

तालुक्यात पक्षाला आलेली मरगळ झटकून सर्वांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणार असल्याची ग्वाही प्रा. पवार यांनी दिली.

गत दोन ते तीन वर्षांपासून काँग्रेस तालुकाध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे काँग्रेसला तालुका नेतृत्वाची गरज होती. दरम्यान, तालुक्याचे सभापती, बाजार समितीचे संचालक व दूध संघाचे संचालक अशा विविध पदांवर काम करण्याचा अनुभव असलेले पवार यांना तालुकाध्यक्षपद मिळाल्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री सतेज पाटील, उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

सिंगल फोटो आहे.

Web Title: Khandala taluka president as Pvt. S. Y. Pawar