खंडाळा नगरपंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:46 IST2021-09-07T04:46:56+5:302021-09-07T04:46:56+5:30

प्रभाग बदलून उभे राहण्याची तयारी खंडाळा शहरातील सतरा प्रभागांची रचना करण्याचे काम सुरू आहे. सर्वच प्रभाग एकसदस्यीय असले, तरी ...

Khandala Nagar Panchayat | खंडाळा नगरपंचायत

खंडाळा नगरपंचायत

प्रभाग बदलून उभे राहण्याची तयारी

खंडाळा शहरातील सतरा प्रभागांची रचना करण्याचे काम सुरू आहे. सर्वच प्रभाग एकसदस्यीय असले, तरी मतदारसंख्येच्या प्रमाणात काही बदल घडून येण्याची शक्यता आहे. कमी मतदार असलेल्या प्रभागांचा विस्तार झाल्यास इच्छुकांना संपर्क वाढवावा लागणार आहे. आरक्षणातही बदल होणार असल्याने अनेक इच्छुकांनी प्रभाग बदलून उभे राहण्याची तयारी सुरू केली आहे.

चौकट

प्रभाग वाढण्याची चिन्हे

खंडाळ्यात मूळ शहरात दाट लोकवस्ती आहे. तेथील प्रभागात मतदार संख्या जास्त आहे, तर विस्तारित शहरात कमी मतदारांचे प्रभाग आहेत. मतदार संख्येवर आधारित प्रभागरचनेत काही बदल घडल्यास मूळ शहरात प्रभाग संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. त्याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

चौकट

विस्तारित भागातील नागरिकांची निराशा

खंडाळा नगरपंचायतीत दोन्ही पक्षांनी सत्तेच्या काळात कोटयवधी रुपयांची कामे करण्याचा प्रयत्न केला. परंतु शहरातील मुख्य रस्ता, विस्तारित भागातील सांडपाणी व्यवस्था, भाजीमंडई व्यवस्थापन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याबाबत मात्र शहरवासीयांची निराशा दिसून येते. नगरपंचायत सत्तेच्या राजकारणात मेळ न बसल्याने गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादी आणि सध्याची भाजप यांना महिला व बालकल्याण सभापतिपद निवडता आले नाही. त्यामुळे विभागाचे काम म्हणावे तेवढे उठावदार झाले नाही.

एकूण प्रभाग - १७

पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी काँग्रेस ९

भाजप (तत्कालीन काँग्रेस) ७

अपक्ष (आरपीआय) १

एकूण मतदार ४६४३

पुरुष २३४१

स्त्री - २३०२

Web Title: Khandala Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.