उदयनराजेंच्या समर्थनार्थ खंडाळा बंद; मुस्लीम समाजाच्या वतीने उंब्रजमध्ये निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 13:46 IST2017-07-25T13:46:42+5:302017-07-25T13:46:42+5:30
सातारा शहराची बाजारपेठ उघडलीच नाही

उदयनराजेंच्या समर्थनार्थ खंडाळा बंद; मुस्लीम समाजाच्या वतीने उंब्रजमध्ये निषेध
आॅनलाईन लोकमत
खंडाळा/उंब्रज (जि. सातारा), दि. २३ : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले मंगळवारी सकाळी स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर सातारा शहराची बाजारपेठ उघडलीच नाही. हे वृत्त समजताच मंगळवारी उंब्रजमध्ये निषेध व्यक्त करण्यात आले. तर खंडाळा बंद पाळण्यात आला.
लोणंद येथील सोना अलार्इंन्ज कंपनीच्या मालकाला खंडणी व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खासदार उदयनराजेंवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यांचा अटकपूर्व जामिन सातारा जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर मंगळवारी खासदार उदयनराजे भोसले स्वत: सातारा शहर पोलिस ठाण्यात स्वत: हजर झाले.
उदयनराजेंना अटक झाल्याचे समजल्यानंतर त्याचे साताऱ्यासह जिल्ह्यात पडसाद उमटले. उंब्रज येथील उदयनराजे भोसले मित्र मंडळ, बाजारपेठेतील व्यापारी व मुस्लीम समाजाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
खंडाळ्यातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूतीर्ने बाजारपेठ बंद ठेवली. त्यामुळे दुपारी एक वाजेपर्यंत बाजारांत शांतता जाणवत होती. अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.