केळघर घाटात कोसळली दरड; सत्र सुरूच

By Admin | Updated: August 14, 2014 00:05 IST2014-08-13T23:50:55+5:302014-08-14T00:05:42+5:30

महाकाय दगड रस्त्यावर पडला व नंतर सुरक्षा कठडा तोडून दरीत कोसळला.

Kelghar ghat; Session begins | केळघर घाटात कोसळली दरड; सत्र सुरूच

केळघर घाटात कोसळली दरड; सत्र सुरूच

मेढा : सातारा-महाबळेश्वर रस्त्यावरील केळघर घाटात काळ्या कड्यानजीक रेंगडी गावाजवळ आज, बुधवारी सकाळी नऊ वाजता दरड कोसळली. या रस्त्यावर एरव्ही मोठी वाहतूक असते; मात्र सुदैवाने ही घटना घडताना कोणतेही वाहन त्याठिकाणी नसल्याने जीवित व वित्तहानी टळली. हा महाकाय दगड रस्त्यावर पडला व नंतर सुरक्षा कठडा तोडून दरीत कोसळला.
केळघर घाटात काळ्या कड्यानजीक दरड कोसळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. आज सकाळी दरडीचा मोठा दगड व आणखी काही भाग अचानक कोसळला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जावळीचे तहसीलदार रणजित देसाई, बांधकाम विभागाचे अभियंता एस. जी. शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबी मशीनच्या साह्याने पडलेले दगड बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच येथे दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. यानंतर या परिसरातील रेंगडी गावानजीक सुमारे १०० ते १५० मीटर परिसरात जमिनीला भेगाही पडल्या होत्या. घटनास्थळी जावळी पंचायत समितीच्या सभापती रूपाली वारागडे, उपअभियंता जे. डी. पाटील, स्थापत्य अभियंता विभागाचे कांता जाधव, आदींनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली. (प्रतिनिधी)

Web Title: Kelghar ghat; Session begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.