जिहे कठापूर उपसा जलसिंचन योजना जलदगतीने मार्गी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:43 IST2021-09-06T04:43:47+5:302021-09-06T04:43:47+5:30
कोरेगाव : जिल्ह्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेचे काम जलदगतीने पूर्ण केले जात आहे. लवकरच कृष्णेचे ...

जिहे कठापूर उपसा जलसिंचन योजना जलदगतीने मार्गी लावणार
कोरेगाव : जिल्ह्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेचे काम जलदगतीने पूर्ण केले जात आहे. लवकरच कृष्णेचे पाणी दुष्काळी भागात खळखळणार आहे,’ असे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी केले.
जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजना प्रकल्पातील ठेकेदार एन. व्ही. खरोटे कंपनीने शनिवारी प्रकल्प स्थळावर आयोजित केलेल्या आमदार शिंदे यांच्यासह खटावच्या गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी योजनेच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
महेश शिंदे म्हणाले, ‘कोणत्याही परिस्थितीत योजनेचे काम पूर्णत्वास नेऊन दुष्काळी भागात पाणी पोहोचविणार आहे. कायम दुष्काळी हा शब्द आता पुसला जाणार आहे. लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत या योजनेचे लोर्कापण केले जाणार आहे.’
कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बर्गे, संतोष जाधव, संदीप केंजळे यांच्यासह कोरेगाव व खटाव तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
फोटोनेम : ०५कोरेगाव
जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजना प्रकल्पाची आमदार महेश शिंदे, राहुल बर्गे, ॲड. श्रीनिवास मुळे, संतोष जाधव, संदीप केंजळे यांनी पाहणी केली.