कोरोना प्रतिबंधासाठी वाई पालिकेने कसली कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:39 AM2021-04-18T04:39:17+5:302021-04-18T04:39:17+5:30

वाई : वाई शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिकेने कंबर कसली असून, उपाययोजनांची तीव्रता अधिक गतिमान केली आहे. नगराध्यक्षा डॉ. ...

Kasai Kamar by Y Municipality for Corona Prevention | कोरोना प्रतिबंधासाठी वाई पालिकेने कसली कंबर

कोरोना प्रतिबंधासाठी वाई पालिकेने कसली कंबर

Next

वाई : वाई शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिकेने कंबर कसली असून, उपाययोजनांची तीव्रता अधिक गतिमान केली आहे. नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, शहरातील दुकानदारांचा सर्व्हे, गृहभेटीद्वारे नागरिकांची तपासणी, प्रतिबंधित क्षेत्रात राबविल्या जाणाऱ्या उपाययोजना आदींच्या नोंदी ठेवल्या जाणार आहेत.

मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांच्या समवेत उपाध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक प्रदीप चोरगे, दीपक ओसवाल, भारत खामकर, चरण गायकवाड, कार्यालय अधीक्षक नारायण गोसावी, बांधकाम अभियंता सचिन धेंडे, कर निरीक्षक अभिजीत ढाणे यांच्या पथकाने बाजारपेठेची पाहणी करून दुकानदारांचा सूचना केल्या. अत्यावश्यक सेवेतील दुकानदार व त्यांचे कर्मचारी यांनी कोरोना चाचणी व लसीकरण केले आहे का? याची विचारणा करून चाचणी, लसीकरण केलेले नसल्यास संबंधितांची दुकाने बंद करण्याची सूचना देण्यात आल्या.

दरम्यान, पथकाने अंत्यसंस्काराच्या व्यवस्थेची देखील पाहणी केली. अंत्यसंस्कार करण्यासाठी एकाचवेळी जास्त मृतदेह येत असल्याने रविवार पेठ येथील उपलब्ध असलेल्या व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून, एकूण चार शववाहिन्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

विविध पथकांमार्फत कोरोना रुग्णांची यादी तयार करणे, कोरोना चाचणी करणे, शहरात सुरू असणाऱ्या कोरोना लसीकरणावर देखरेख ठेवणे, कोरोनाबाधित रुग्णांना मिळणारा औषधौपचार तसेच गृह विलगीकरणातील रुग्णांच्या दैनिक तपासणीबाबत विविध यंत्रणांत समन्वय राखणे, प्रशासनामार्फत तयार करण्यात आलेल्या शीघ्र प्रतिसाद पथकांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांवरील अंत्यसंस्कारसाठी व्यवस्था करणे, सर्व किराणा व अत्यावश्यक सुविधा घरपोच देणेबाबत सबंधितांना सूचना देणे अशा कामांच्या जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे.

फोटो : १७ वाई फोटो

वाई पालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक भारत खामकर, प्रदीप चोरगे आदींनी वाई येथील स्मशानभूमीची पाहणी केली.

Web Title: Kasai Kamar by Y Municipality for Corona Prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.