कास पठारावर वणवा; शेकडो हेक्टरमधील सुका चारा जळून खाक
By Admin | Updated: November 20, 2015 00:09 IST2015-11-19T23:22:38+5:302015-11-20T00:09:50+5:30
अतिउत्साही पर्यटकांनी गणेशखिंडीचा माळ, पेट्री गाव व कास पठारावर वणवा लावला

कास पठारावर वणवा; शेकडो हेक्टरमधील सुका चारा जळून खाक
पेट्री : सातारा जिल्ह्यातील कास पठारासह गणेशखिंड व पेट्री गावालगत तीन ठिकाणी काही अतिउत्साही पर्यटकांनी वणवा लावून निसर्ग सौंदर्याची अपरिमीत हानी केली आहे. या वणव्यामध्ये शेकडो हेक्टरमधील जनावरांचा सुका चारा जळून खाक झाला आहे.
दिवाळीची सुटी साजरी करण्यासाठी सध्या सातारा तालुक्यातील कास पठार परिसरात पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. सातारा तसेच बाहेरीलही पर्यटक येथे येत आहेत. काही हौसी पर्यटक ओल्या पार्ट्याही करत आहेत. अशा काही अतिउत्साही पर्यटकांनी गणेशखिंडीचा माळ, पेट्री गाव व कास पठारावर वणवा लावला. त्यामध्ये जनावरांचा सुका चारा जळून नष्ट झाला. वनविभागाने अशा पर्यटकांवर लक्ष ठेवून कास पठाराची हानी टाळावी, अशी मागणी निसर्गप्रेमी आणि परिसरातील नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)