शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गुलदार युद्धनौका पर्यटन मंडळाकडे सोपवण्याचा सन्मान माणच्या सुपुत्राला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 11:53 IST

नवनाथ जगदाळे दहिवडी : भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडे सोपवण्याचा सन्मान माण तालुक्याचे सुपुत्र कारवार ...

नवनाथ जगदाळेदहिवडी : भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडे सोपवण्याचा सन्मान माण तालुक्याचे सुपुत्र कारवार नौदलाचे कॅप्टन जयवंत आनंदराव इंदलकर यांना मिळाला.गुलदार ही निवृत्त युद्धनौका नौदलाकडून महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडे सोपवणारे नौदलाचे कॅप्टन जयवंत आनंदराव इंदलकर हे उकिरडे महिमानगडचे सुपुत्र आहेत. केंद्रीय संघ लोकसेवा आयोगामार्फत नेव्हल एक्झिक्यूटिव्हपदी निवड झालेले जयवंत इंदलकर सध्या नौदलामध्ये कॅप्टन समकक्ष कर्नल या सन्मानाच्या पदावर कारवार येथे कार्यरत आहेत. देशभरातील नौदलाच्या विविध कॅम्पमध्ये जयवंत इंदलकर यांनी आजवर उल्लेखनीय सेवा केलेली आहे.महाराष्ट्र पर्यटन महामंडळ गुलदार युद्धनौकेचा वापर समुद्राच्या आत मालवणच्या वेंगुर्लाजवळील निवती समुद्रात पाण्याखालील पर्यटन आणि आर्टिफिशियल रिप पर्यटनासाठी करणार आहे. या युद्धनौकेचे प्रमाणित स्कुबा ड्रायव्हरच्या माध्यमातून पर्यटकांना दर्शन घेता येणार असून पर्यटकांसाठी हे खास आकर्षण असणार आहे.कॅप्टन जयवंत इंदलकर यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, सनदी अधिकारी सुरेश जाधव, माजी अपर राज्यकर आयुक्त विलासराव इंदलकर, मंत्रालय उपसचिव प्रकाश इंदलकर, माजी जॉइंट कमिशनर उत्तमराव इंदलकर, जिल्हा न्यायाधीश सूर्यकांत इंदलकर, क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवडचे अध्यक्ष विश्वंभर बाबर, बाळासाहेब पिसाळ यांनी नौदल कॅप्टन जयवंत इंदलकर यांचे कौतुक केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरindian navyभारतीय नौदलtourismपर्यटनsindhudurgसिंधुदुर्ग