होतकरू संदीपच्या जाण्याने कार्वे गाव सुन्न

By Admin | Updated: November 2, 2014 00:39 IST2014-11-02T00:38:48+5:302014-11-02T00:39:25+5:30

गावात अंत्यसंस्कार : बहिणीची शुध्द हरपली

Karve village sleeps due to budding Sandeep | होतकरू संदीपच्या जाण्याने कार्वे गाव सुन्न

होतकरू संदीपच्या जाण्याने कार्वे गाव सुन्न

कार्वे : शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक काही तरुणांच्या मोबाईलवर संदीपच्या अपघाती मृत्यूची माहिती येऊ लागली़ सुरुवातीला यावर अनेकांचा विश्वासच बसेना़ संदीपच्या निधनाची बातमी गावातच नव्हे, तर परिसरात वाऱ्यासारखी पसरली़
कार्वे येथील संदीपने कामावर ये-जा करण्यासाठी एक दुचाकी खरेदी केली़ संदीप नोकरीबाबत फारच गांभीर्याने विचार करायचा. एका सामूहिक खोलीमध्ये तो मित्रांसोबत राहायचा. हा होतकरू तरुण यशाचे एकएक शिखर पादाक्रांत करीत असतानाच शुक्रवारी पहाटे त्याला काळाने हिरावून नेले. शुक्रवारी सायंकाळी त्याचा मृतदेह कार्वेत आणण्यासाठी पुण्याहून अ‍ॅम्ब्युलन्स निघाली़ ग्रामस्थांसह संदीपच्या मित्रांनाही त्यावेळी गहिवरून आले.संदीपने चारचाकी गाडी आणायला कशाला जायचे़ जीव धोक्यात कशाला घालायचा, अशी चर्चा सुरू होती़
पुण्याहून मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास संदीपचा मृतदेह गावात आणण्यात आला. एवढ्यात आई व बहीण सारिकाने आक्रोश केला़ मात्र, आरडाओरडा करणारी बहिणीची शुद्ध हरपली. अखेर मध्यरात्री दोन वाजता संदीपवर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Karve village sleeps due to budding Sandeep