कऱ्हाडला कर सल्लागारांचे जीएसटीविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST2021-02-05T09:14:27+5:302021-02-05T09:14:27+5:30
यावेळी करसल्लागार संघटनेच्यावतीने केंद्रीय जीएसटी कार्यालयात निवेदन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप तलाठी, उपाध्यक्ष विकास पाटील, खजिनदार समीर पाटील ...

कऱ्हाडला कर सल्लागारांचे जीएसटीविरोधात आंदोलन
यावेळी करसल्लागार संघटनेच्यावतीने केंद्रीय जीएसटी कार्यालयात निवेदन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप तलाठी, उपाध्यक्ष विकास पाटील, खजिनदार समीर पाटील यांनी निवेदन दिले. जीएसटी अधीक्षक सचिन उपाध्ये यांनी निवेदन स्वीकारले.
अध्यक्ष संदीप तलाठी यांनी या आंदोलनामागची भूमिका विशद केली व करदात्यांची या त्रासातून लवकरच सुटका व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ सदस्य दीपक पेंढारकर, के. एल. सावंत, शिरीष गोडबोले, सुनील मुंद्रावळे, व्ही. एल. सावंत, संजय बुटाला, चंद्रकांत हावरे, राहुल कुलकर्णी, चंद्रशेखर ठोके, आयुब संदे, राजेश कराडकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते. आभार विकास पाटील यांनी मानले.
फोटो : ३०केअरडी०१
कॅप्शन : कऱ्हाड येथे केंद्रीय जीएसटी अधीक्षक सचिन उपाध्ये यांना कर सल्लागार संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी संदीप तलाठी, विकास पाटील, समीर पाटील उपस्थित होते.