शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडकर मठाचे मठाधिपती संशयास्पदरीत्या बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 13:37 IST

कऱ्हाड येथील मारुतीबुवा कऱ्हाडकर मठाचे मठाधिपती बाजीरावमामा कऱ्हाडकर हे संशयास्पदरीत्या बेपत्ता झाले आहेत. सोमवारी दुपारी बँकेतून जाऊन येतो, असे सांगून ते मठातून निघून गेले. त्यानंतर ते परतले नसल्याची फिर्याद त्यांचे चुलते शरद बाबूराव जगताप यांनी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

ठळक मुद्देकऱ्हाडकर मठाचे मठाधिपती संशयास्पदरीत्या बेपत्तावारकरी सांप्रदायाला धक्का पोलिसांत फिर्याद; कसून शोध सुरू

कऱ्हाड : येथील मारुतीबुवा कऱ्हाडकर मठाचे मठाधिपती बाजीरावमामा कऱ्हाडकर हे संशयास्पदरीत्या बेपत्ता झाले आहेत. सोमवारी दुपारी बँकेतून जाऊन येतो, असे सांगून ते मठातून निघून गेले. त्यानंतर ते परतले नसल्याची फिर्याद त्यांचे चुलते शरद बाबूराव जगताप यांनी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेने वारकरी सांप्रदायाला मोठा धक्का बसला असून, जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाडातील मारुतीबुवा कराडकर मठाचे मठाधिपती म्हणून गुरुवर्य बाजीराव बुवा गुरू मारुतीबुवा कराडकर हे गत दीड वर्षापासून काम पाहत होते. मठाधिपती बाजीरावमामा हे शहरातील गुरुवारपेठेतील रहिवासी असले तरी ते मठातच वास्तव्यास होते.

सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते मठातील सेवेकरी निखिल ढमाळ यांना मी बँकेतून जाऊन येतो, असे सांगून मठातून बाहेर पडले. त्यानंतर सेवेकऱ्यांसह वारकऱ्यांनी सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची वाट पाहिली. मात्र, ते परत आले नाहीत. त्यामुळे सेवेकºयांनी बँक परिसरासह शहरात इतर ठिकाणी त्यांचा शोध घेतला.मात्र, ते कोठेही सापडले नाहीत. त्यामुळे याबाबतची माहिती रात्री उशिरा चुलते शरद जगताप यांना देण्यात आली.घटनेची माहिती मिळताच शरद जगताप यांच्यासह सेवेकरी आणि वारकरी मठात दाखल झाले. त्यांनीही मठाधिपतींचा शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाहीत. त्यामुळे अखेर रात्री उशिरा याबाबतची फिर्याद कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक दीपिका जौंजाळ तपास करीत आहेत.बँकेत पोहोचले; पण नंतर गायबमठाधिपती बाजीरावमामा कऱ्हाडकर हे बँकेत जाऊन येतो, असे सांगून मठातून निघून गेले होते. त्यामुळे सहायक निरीक्षक दीपिका जौंजाळ यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी कॉसमॉस बँकेला भेट देऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी मठाधिपती बँकेत आल्याचे दिसून आले. मात्र, बँकेतून बाहेर पडल्यानंतर ते अचानक बेपत्ता झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हाPoliceपोलिस