कऱ्हाडकरांना मिळाल्या सुंदर हस्ताक्षराच्या क्लृप्त्या !

By Admin | Updated: December 16, 2014 23:35 IST2014-12-16T22:29:34+5:302014-12-16T23:35:35+5:30

‘लोकमत बाल विकास मंच आणि सखी मंच’ कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Karhadar received a beautiful handwriting case! | कऱ्हाडकरांना मिळाल्या सुंदर हस्ताक्षराच्या क्लृप्त्या !

कऱ्हाडकरांना मिळाल्या सुंदर हस्ताक्षराच्या क्लृप्त्या !

कऱ्हाड : सुंदर हस्ताक्षर हा दागिना समजला जातो आणि या दागिन्याची बालचमूंसह त्यांच्या पाल्यांना ओळख व्हावी, यासाठी पालिकेच्या शाळा क्रमांक तीनमध्ये ‘हॅन्डरायटिंग इम्प्रूव्हमेंट कॅम्प’चे आयोजन करण्यात आले होते. ‘लोकमत बाल विकास मंच आणि सखी मंच’ कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी कॅम्पमध्ये सहभागी होत अक्षर वळणदार करण्याचा सराव केला़
रविवारी सकाळी दहा ते बारा या वेळेत झालेल्या या कॅम्पला कऱ्हाड शहरातील पालकांनी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. सकाळपासूनच नागरिक कॅम्पस्थळी दाखल होत होते़ चिमुकल्यांना घेऊन त्यांचे पालकही प्रशिक्षणस्थळी हजर होते़ प्रारंभी कार्यक्रमाचे उद्घाटन संजय पाटील, अर्जुन कोळी, प्राची शहा, शारदा पवार यांच्या हस्ते झाले. सातारा येथील ईशा प्ले स्कूलच्या संचालिका प्राची शहा यांनी हस्ताक्षर वळणदार आणि सुंदर काढण्यासाठीच्या क्लृप्त्या प्रशिक्षणार्थींना दिल्या़ दोन तास चाललेल्या या कॅम्पला लहानांसह मोठ्यांनीही हजेरी लावली़ (प्रतिनिधी)


डान्स इंडिया डान्स फेम सिद्धेश पै जानेवारीत साताऱ्यात
पंकज चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमीने दि. २ ते ११ जानेवारी या कालावधीत डान्स वर्कशॉपचे आयोजन केले आहे. यासाठी डान्स इंडिया डान्स फेम नृत्यदिग्दर्शक सिद्धेश पै साताऱ्यात नृत्याचे धडे देणार आहे. ‘लोकमत’ याचे माध्यम प्रायोजक आहे.लोकमतच्या सखी, बाल आणि युवा नेक्स्टच्या सभासदांना या वर्कशॉपच्या प्रशिक्षण फी मध्ये घसघशीत सवलत मिळणार आहे. अधिक माहितीसाठी लोकमत कार्यालय आणि पंकज चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमी, कमानी हौद येथे संपर्क साधावा.


हस्ताक्षर
सुधारण्याच्या उपाय
हस्ताक्षर सुधारण्यासाठी कोणते बदल करावेत़, अक्षर कसे काढावे, कोणता कागद व पेन वापरावा, तो कसा पकडावा, उभे अक्षर, तिरके अक्षर, चांगल्या पद्धतीने कसे काढावे, हे आयोजकांमार्फत शिकविण्यात आले़ प्रत्येक वयोगटासाठी विविध पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले़


कऱ्हाड येथे ‘लोकमत बाल विकास मंच आणि सखी मंच’ आयोजित ‘हॅन्डरायटिंग इम्प्रूव्हमेंट कॅम्प’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Web Title: Karhadar received a beautiful handwriting case!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.