कऱ्हाडचे पोलीस ‘अॅक्शन मोड’वर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:42 IST2021-05-21T04:42:09+5:302021-05-21T04:42:09+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत. असे असतानाही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांमुळे रस्त्यांवर गर्दी वाढत होती. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक ...

कऱ्हाडचे पोलीस ‘अॅक्शन मोड’वर!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत. असे असतानाही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांमुळे रस्त्यांवर गर्दी वाढत होती. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी गुरुवारी अचानकपणे भेदा चौकात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी मोहीम राबविली. ही नाकाबंदी व एकूणच दिवसभरात पोलिसांनी ८७ दुचाकींवर कारवाई केली. संबंधितांना दंड करण्यात आला तसेच दुचाकीही जप्त करण्यात आल्या. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांविरोधात पोलीस रोजच कारवाई करत आहेत तरीही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने गुरुवारी कारवाईची धडक मोहीम राबविण्यात आली. कोल्हापूर नाका, कृष्णा कॅनॉल, विजय दिवस चौक आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली तसेच पालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाने दिवसभर शहरातील सुमारे २५ दुकानांवर कारवाई करून प्रत्येकी तीन हजारप्रमाणे ७५ हजारांचा दंड वसूल केला. विनामास्क फिरणाऱ्या ६० जणांवर कारवाई करून त्यांच्याकडूनही दंड वसूल करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
फोटो : २०केआरडी०४
कॅप्शन : कऱ्हाडातील भेदा चौकात गुरुवारी पोलिसांनी कारवाईची मोहीम राबवून विनाकारण फिरणाऱ्यांच्या दुचाकी जप्त केल्या.