कऱ्हाड, पाटण, माण, जावळीत संघर्ष अटळ!

By Admin | Updated: April 14, 2015 00:39 IST2015-04-14T00:39:29+5:302015-04-14T00:39:29+5:30

जिल्हा बँक : पतसंस्था-सहकारी बँका गटांतही जोराची चढाओढ

Karhad, Patan, Maan, Jawalat struggle unavoidable! | कऱ्हाड, पाटण, माण, जावळीत संघर्ष अटळ!

कऱ्हाड, पाटण, माण, जावळीत संघर्ष अटळ!

सागर गुजर ल्ल सातारा
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये कऱ्हाड, पाटण, माण व जावळी तालुका सोसायटी मतदारसंघांत संघर्ष अटळ असल्याचे चित्र समोर येत आहे. नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघातही जोरदार चढाओढ असून, याठिकाणीही रंगतदार लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्याची मातृसंस्था असणाऱ्या या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. १२८ उमेदवारांचे २०३ अर्ज छाननीत वैध ठरले असून, अर्ज मागे घेण्यासाठी चार दिवस सरले तरी एकही उमेदवारी अर्ज मागे घेतला गेला नाही.
जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली राष्ट्रवादीअंतर्गत सुरू आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना निवडणूक बिनविरोध करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने जोरदार प्रयत्न सुरू असले तरी त्याला अद्याप यश आलेले पाहायला मिळत नाही. अनेकांची मनधरणी करण्यात यश आल्याची कुजबूज राष्ट्रवादीअंतर्गत आहे. पण प्रत्यक्षात कोणीही अर्ज मागे घेतला नसल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
या परिस्थितीत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये मोठे यश येत असल्याचे सांगितले जात आहे.
कऱ्हाडमधून विलासराव पाटील-उंडाळकर यांना बिनविरोध करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असले तरी मानसिंग जगदाळे, दीपक पाटील, धनंजय पाटील, वसंतराव जगदाळे, दत्तात्रय जाधव यांनी स्थानिक पातळीवर आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
पाटणमध्ये देसाई-पाटणकर घराण्यातील पारंपरिक राजकीय तिढा कायम असल्याने याठिकाणी सोसायटी मतदारसंघात संघर्ष अटळ आहे. आमदार देसाई, विक्रमसिंह पाटणकर यांनी या निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. माणमध्येही हीच परिस्थिती आहे. आमदार जयकुमार गोरे यांनी विधानसभा निवडणुकीत सलग दोन टर्म आपले वर्चस्व निर्माण केले. माजी आमदार सदाशिव पोळ व आ. गोरेंचे बंधू शेखर गोरे यांनीच त्यांच्याविरोधात रान उठविले आहे. बँकेसाठी गोरे बंधूंमध्ये थेट संघर्ष होणार नसला तरी पोळांच्या गटाला शेखर गोरेंची साथ असल्याची जोरदार चर्चा आहे.
नागरी बँका, पतसंस्था या गटातून दिवंगत विलासराव पाटील-वाठारकर यांचे चिरंजीव राजेश पाटील, प्रभाकर साबळे, प्रदीप विधाते, विनोद कुलकर्णी, सुरेंद्र गुदगे, रामराव लेंभे, नानासाहेब मोरे, भास्करराव गुंडगे, रविराज देसाई, सुनील पोळ, शिवाजी भोसले, आनंदराव जुनघरे, सुनील खत्री यांनी अर्ज दाखल केले आहेत. याठिकाणीही संघर्ष आहे.
किसन वीर कारखान्याच्या बदल्यात बँक! ि
कसन वीर साखर कारखान्याची निवडणूक लढणार नसल्याचे राष्ट्रवादीतर्फे जाहीर करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर वाई तालुका सोसायटी मतदारसंघातून काँगे्रसतर्फे राष्ट्रवादीचे नितीन पाटील यांना ‘क्लिन चिट’ देण्याची शक्यता आहे. वाईतून काँगे्रसचे दिनकर (बापू) शिंदे व किसन वीरचे संचालक रतन शिंदे यांचे अर्ज दाखल आहेत.
शिवाजीराजे-कल्पनाराजेंकडून मध्यस्थी
फलटणचे निंबाळकर व सातारचे भोसले या दोन घराण्यांत फार पूर्वीपासूनचे नातेसंबंध आहेत. मधल्या काळात विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले यांच्यात वाक्युद्ध पेटले होते. जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद मिटविण्यासाठी राजघराण्यातील ज्येष्ठ साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले व कल्पनाराजे भोसले यांच्याकडून प्रयत्न होणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, या मध्यस्थीची सुरुवात रामराजेंचे बंधू रघुनाथराजे निंबाळकर यांनी सुरूही केली आहे.



 

Web Title: Karhad, Patan, Maan, Jawalat struggle unavoidable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.