कऱ्हाड उत्तर काँग्रेसच्या अध्यक्षपदी हेमंत जाधव यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी दादासाहेब चव्हाण, जोतिराम पवार, प्रतापराव देशमुख, जयसिंगराव जाधव, सुदाम दीक्षित, दीपक लिमकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच खजिनदारपदी भाऊसाहेब घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी भीमराव थोरात, प्रतापराव पवार, चंद्रकांत साळुंखे, संजय साळुंखे, विजय पाटील, लहुराज यादव, उमेश चव्हाण, रामचंद्र साळुंखे, प्रशांत मोरे, विजयकुमार कदम, राजकुमार धोकटे, भीमराव डांगे, चिटणीसपदी राजेंद्र शिंदे, प्रकाश खंडागळे, दीपक शिंदे, संग्राम सूर्यवंशी, वैभव साळुंखे, आनंदराव चव्हाण, संदीप गायकवाड, रामचंद्र पवार, शहाजीराव पवार, सुहास जाधव,दादासाहेब निकम, सतीश पवार, प्रकाश पवार, बाबासाहेब पवार आदींची निवड करण्यात आली आहे.
किसान सेलमध्ये उमेश मोहिते, प्रदीप निकम, संजय गोडसे, बाबासाहेब खंडागळे, आण्णासो थोरात आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी सेलमध्ये रफिक मुल्ला, पांडुरंग झंजे, आसिफ मुल्ला, विजय पाटोळे आदींची नियुक्ती करण्यात आली असून अल्पसंख्याक सेलमध्ये नौशाद मुल्ला, मुबारक मुलाणी, खानसाहेब पठाण, आसिफ मुल्ला आदींची निवड करण्यात आली आहे. तर सेवादलमध्ये संजय घाडगे, जालिंदर बोबडे आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.