करण सिन्हा फ्रीडम पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:42 IST2021-05-21T04:42:11+5:302021-05-21T04:42:11+5:30
म्हसवड - अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत उच्च शिक्षण घेत असलेल्या येथील करण विजय सिन्हा यांना फ्रीडम पुरस्कार ने ...

करण सिन्हा फ्रीडम पुरस्काराने सन्मानित
म्हसवड - अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत उच्च शिक्षण घेत असलेल्या येथील करण विजय सिन्हा यांना फ्रीडम पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले. फ्रीडम म्हणजे लोकशाहीचा अवार्ड २०२० ते २०२२" साठी दिला. अमेरिकेतील या नामांकित विद्यापिठात हा अवार्ड मिळवणारा करण सिन्हा हा पहिलाच भारतीय विद्यार्थी आहे. हा अवार्ड दर दोन वर्षांतून दिला जातो.
करण सिन्हा याने विद्यार्थी दशेतच माण तालुक्यातील म्हसवड येथील मेगा सिटी भव्य ग्रंथालय उभारले आहे. तसेच भारताचे व अमेरिकेचे संबंध वाढावे यासाठी एग्रीकल्चर ट्रेड वेबिनार घेतला. तसेच महिला, तरुणांसाठी, त्याच बरोबर ट्रक अणि ट्रॅक्टर संदर्भात लोकसभेत खासदार हुसैन दलवाई ह्यांच्या मार्फत शून्य प्रहरातला प्रश्न उपस्थित केला होता.
जगभरात अस्सल माणदेशी गावरान ज्वारी महोत्सव होण्यासाठी तो जागतिक पातळीवर कार्य करीत आहे. म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. अमेरिकेत शिक्षण घेत असताना येथील माणदेशी फाउंडेशनच्या सर्व कार्यात नेहमीच त्याचा सहभाग राहतो. करण सिन्हास अमेरिकेतील नामवंत विद्यापिठाने पुरस्काराने सन्मानित केले बद्दल त्याचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
फोटो -
करण सिन्हा
===Photopath===
200521\img-20210520-wa0058.jpg
===Caption===
अमेरीकेतील फ्रीडम पुरस्कार करण सिन्हा यांना