कर्जमाफी होईना; शेतकरी परतफेड करेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 14:04 IST2017-07-31T13:58:28+5:302017-07-31T14:04:31+5:30
ढेबेवाडी : कर्जमाफीच्या निर्णयाचे प्रबोधन शेतकºयांमध्ये झाले नसल्याने जिल्हा बँकेसह विकास सेवा सोसायट्या अडचणीत सापडल्या आहेत. नियमीत कर्जदार शेतकºयांनीही पाठ फिरवल्याने जिल्हा बँकेच्या अधिकाºयांसह सोसायट्यांचे ‘अण्णासाहेब’ दारोदारी फिरू लागले आहेत.

कर्जमाफी होईना; शेतकरी परतफेड करेना!
प्रत्येक सोसायटीच्या माध्यमातून त्या त्या गावातील सभासदांना जमिनींच्या क्षेत्रावर अर्थसहाय्य केले जाते. यावर्षी शासनाने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केल्याने बळीराजा सुखावला; पण या कर्जमाफीच्या निर्णयाचा अभ्यासच अनेकांनी केला नसल्याने आणि त्याबाबत प्रबोधनही झाले नसल्याने केवळ थकबाकीदारच नव्हे तर नियमीत कर्जदार शेतकºयांनीही कर्ज परतफेडीकडे पाठ फिरवली आहे. यामुळे बहुतेक विकास सेवा सोसायट्या बँक पातळीवर थकीत दिसू लागल्या आहेत.
जुलै अखेरची परतफेडीची मुदत असल्याने सचिवांनी कर्जदारांकडे वसूलीचा तगादा लावला आहे. शेतकरी त्यांना दाद देत नसल्याने आता सुट्टीदिवशीही बँकेचे वरीष्ठ अधिकारी आणि आण्णासाहेब कर्जदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना विनवण्या करत आहेत. |