शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडच्या विजयस्तंभाला मिळाली नवी झळाळी, ‘एलईडी कर्ब स्टोन’ बसवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 13:25 IST

कऱ्हाड : शहरातील विजय दिवस चौकातील ‘अमर जवान’ स्तंभाला नवी झळाळी मिळाली असून, ‘एलईडी कर्ब स्टोन’ हा रंगीबेरंगी स्टोन ...

कऱ्हाड : शहरातील विजय दिवस चौकातील ‘अमर जवान’ स्तंभाला नवी झळाळी मिळाली असून, ‘एलईडी कर्ब स्टोन’ हा रंगीबेरंगी स्टोन बसवला आहे. कर्ब या नव्या तंत्राने विजय दिवस चौकाच्या सौंदर्यात भर पडली आहे.विशेष म्हणजे पुणे, मुंबईसारख्या मेट्रो सिटीनंतर हा उपक्रम सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच राबवला जात आहे. कऱ्हाड शहराच्या दृष्टीने विजय दिवस चौकाला विशेष महत्त्व आहे. चौकात उभारलेल्या ‘अमर जवान’ स्तंभाकडे पाहिल्यावर शहिदांच्या आठवणींना उजाळा मिळतो. या चौकातील ‘अमर जवान’ स्तंभाचे सुशोभीकरण करण्याची संकल्पना कऱ्हाडच्या दिवंगत समीर पवार मित्रमंडळाची होती. स्तंभाचे सुशोभीकरण करण्याचा मानस विजय दिवस समारोह समितीचे अरुण जाधव यांना सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांनी बोलून दाखवला. त्यानुसार पवार यांनी कऱ्हाडच्या संभव सर्व्हिसेसचे केतन शहा यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. त्यानुसार मुंबई, पुणेच्या धर्तीवर ‘एलईडी कर्ब स्टोन’ बसवण्याचे नियोजन झाले. आधुनिक पद्धतीच्या या कर्ब स्टोनचे प्रात्यक्षिक केतन शहा यांनी माजी नगरसेवक अरुण जाधव, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांना दाखवले. त्यांनीही या सुशोभीकरणाचे कौतुक केले. मुख्याधिकारी शंकर खंदारे, नगर अभियंता रत्नरंजन गायकवाड यांचीही परवानगी घेण्यात आली.विजयस्तंभाला बसविण्यात आलेली आधुनिक एलईडी एवढी मजबूत आहे की ती २०० टनाचा भार सहन करू शकते. दिवसा हे रंगीबेरंगी दिसत असल्याने वाहनधारकांना सहज नजरेस पडणार आहे. सायंकाळनंतर त्यात एलईडी लाइट लागल्यानंतर सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. शिवाय हे बसविल्यानंतर देखभाल दुरुस्तीचा खर्च नाही. पावसाळ्यातही हे टिकून राहणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराड