काले, सैदापूर, उंब्रजची सरपंच निवड सोमवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:12 IST2021-02-06T05:12:50+5:302021-02-06T05:12:50+5:30

निवड 8 व 10 रोजी, मोर्चेबांधणी सुरू कऱ्हाड : नुकत्याच निवडणुका झालेल्या कऱ्हाड तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींची सरपंच निवड ...

Kale, Saidapur, Umbraj Sarpanch elected on Monday | काले, सैदापूर, उंब्रजची सरपंच निवड सोमवारी

काले, सैदापूर, उंब्रजची सरपंच निवड सोमवारी

निवड 8 व 10 रोजी, मोर्चेबांधणी सुरू

कऱ्हाड : नुकत्याच निवडणुका झालेल्या कऱ्हाड तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींची सरपंच निवड सोमवार दि. ८ व बुधवार दि. १० रोजी होत आहे. तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्त्वाच्या ग्रामपंचायती म्हणून ओळख असलेल्या काले, सैदापुर, उंब्रज व हजारमाचीची सरपंच निवड ८ रोजी होत आहे. याबाबत तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

तालुक्यातील एकूण १०४ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक व निकाल जाहीर झाल्यानंतर २९ जानेवारी रोजी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. वास्तविक सरपंच पदांचे आरक्षण जाहीर झाल्यापासूनच गावोगावी सतास्थापनेची मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

निवडणुका झालेल्या सर्व गावांना सरपंच निवडीची प्रतीक्षा लागली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने ८ ते १० फेब्रुवारीदरम्यान सरपंच निवडी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी तालुक्यातील सर्व १०४ ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडी ८ व १० रोजी घेण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अमरदीप वाकडे यांनी प्रशिक्षण दिले.

सोमवार दि. ८ रोजी सरपंच निवडी होणारी गावे : हजारमाची, किरपे, विंग, कार्वे, मुंढे, ओंड, शेरे, मालखेड, घारेवाडी, खुबी, गायकवाडवाडी, शहापूर, म्हासोली, कालवडे, साकुर्डी, जखिणवाडी, भोळेवाडी, धोंडेवाडी, पोतले, साळशिरंबे, शेवाळवाडी (म्हासोली), सवादे, केसे, घोगाव, गोटेवाडी, कोणेगाव, शिवडे, वस्ती साकुर्डी, उंब्रज, इंदोली, मरळी, तासवडे, शिरवडे, शिरगाव, वहागाव, तांबवे, खराडे, पाल, साजुर, गोळेश्वर, वारूंजी, चिखली, वाठार, कोळे, सैदापूर, येरवळे, गोटे, नांदलापूर, काले, उंडाळे, पार्ले, निगडी, बनवडी, पेरले, विरवडे, करवडी, कोडोली, गोवारे, बेलवडे हवेली

बुधवार दि.१० रोजी सरपंच निवड होणारी गावे :

कामथी, येणके, शिंदेवाडी (विंग), जिंती, शेणोली, संजयनगर, वाघेश्वर, लटकेवाडी, गमेवाडी, बेलदरे, म्होप्रे, नांदगाव, महारूगडेवाडी, शेळकेवाडी (म्हासोली), शेवाळवाडी (उंडाळे), पाडळी केसे, टाळगाव, भुरभुशी, रिसवड, भवानवाडी, अंबवडे, खालकरवाडी, हरपळवाडी, वडगाव उंब्रज, वराडे, मडोली निळेश्वर, चोरे, खोडशी, अबईचीवाडी, नवीन कवठे, खोडजाईवाडी, कोपर्डे हवेली, बेलवडे बु., बामनवाडी, पाचुंद, चचेगाव, वसंतगड, भरेवाडी, चौगुले मळा, अक्काईचीवाडी, हणबरवाडी, भुयाचीवाडी, वाघेरी व सुर्ली.

संबंधित गावचे निवडणूक निर्णय अधिकारी सरपंच निवडीच्या सभेची नोटीस सर्व सदस्यांना देतील. त्या दिवशी सकाळी १० ते १२ या वेळेत सरपंच पदासाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. यानंतर दोन वाजता सभेस सुरुवात होईल. यानंतर प्रथम दाखल अर्जांची छाननी, अर्ज माघार व त्यानंतर एकपेक्षा अधिक उमेदवारांचे अर्ज निवडणूक रिंगणात राहिल्यास मतदान, अशी प्रक्रिया होणार आहे.

Web Title: Kale, Saidapur, Umbraj Sarpanch elected on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.