काँगेसच्या माण तालुकाध्यक्षपदी काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:25 IST2021-06-19T04:25:58+5:302021-06-19T04:25:58+5:30

दहिवडी : आंधळीचे सरपंच दादासाहेब जगन्नाथ काळे यांची माण तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नानासाहेब ...

Kale as the Maan taluka president of the Congress | काँगेसच्या माण तालुकाध्यक्षपदी काळे

काँगेसच्या माण तालुकाध्यक्षपदी काळे

दहिवडी : आंधळीचे सरपंच दादासाहेब जगन्नाथ काळे यांची माण तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.

दादासाहेब काळे चळवळीतील एक कार्यकर्ते आहेत. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंधळी जिल्हा परिषद गटामधून त्यांच्या पत्नी सदस्या होते, तर आता ते आंधळीचे सरपंच आहेत. त्यांनी युवक काँग्रेसचे सचिव असताना अनेक आंदोलने केली आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देण्यात आले आहे. या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, विश्वजित कदम, युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, रणजित देशमुख, प्रांतिक सदस्य बाळासाहेब माने, जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, युवकचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, अशोक गोडसे, धनश्री महाडीक, मनोज तपासे, नरेंद्र देसाई, प्रा. विश्वंभर बाबर, विजय धट, नकुसाताई जाधव, धर्मराज जगदाळे, सचिन घाडगे, नीलेश दडस, मंगेश जगदाळे, अशोक पोतेकर, बाबा माने, सागर सावंत, पंकज पोळ यांनी कौतुक केले.

Web Title: Kale as the Maan taluka president of the Congress