कुठरे-मेरवेवाडी ग्रामपंचायतींत अपहार

By Admin | Updated: July 13, 2014 22:29 IST2014-07-13T22:26:30+5:302014-07-13T22:29:01+5:30

ग्रामस्थांची तक्रार : चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Kaira-Mervewadi Gram Panchayatam Apahara | कुठरे-मेरवेवाडी ग्रामपंचायतींत अपहार

कुठरे-मेरवेवाडी ग्रामपंचायतींत अपहार

सणबूर : कुठरे-मेरवेवाडी, ता़ पाटण येथील ग्रामपंचायतींमध्ये चार वर्षांपासून सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करण्यात आला आहे. तसेच शासकीय निधीचा अपहार करण्यात आला आहे़ एका महिन्यात याची चौकशी करून अपहाराची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय कोकरे़, माजी सरपंच दिनकर मोरे आणि सदाशिव सपकाळ यांनी केली आहे़
याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांच्याकडे देण्यात आलेल्या तक्रारअर्जात म्हटले आहे की, चार वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली़ त्यामुळे शंकर पवार यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली़ मात्र, त्यांनी सरपंच झाल्यापासून कधीही ग्रामस्थांना एकत्रित बोलवून विकासकामांबाबत चर्चा केली नाही़ ग्रामसेवकाला हाताशी धरून शासकीय निधीचा गावाच्या विकासासाठी वापर न करता तो निधी स्वत:च लाटला़ पर्यावरण संरक्षण योजना, तेरावा वित्त आयोग तंटामुक्त अभियान पुरस्काराची रक्कम कुठे खर्च केली, हे देखील अद्याप कळाले नाही़ ग्रामस्थांकडून नळ योजनेसाठी गोळा केलेली रक्कमही गायब करण्यात आली़
नवीन नळयोजनेच्या दुरुस्तीसाठी खर्च दाखवून पैसे काढले आहेत. गत वर्षापासून आम्ही सरपंच व ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा हिशोब मागत आहे. मात्र, त्यांनी तो दिला नाही़ याशिवाय ग्रामसभाही घेतली नाही़
याबाबत पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनाही वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यांनी दखल घेतलेली नाही़ याप्रकरणी रक्कम वसूल करून ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा करावी अशी मागणी करण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Kaira-Mervewadi Gram Panchayatam Apahara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.