शहरं
Join us  
Trending Stories
1
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
2
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
3
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
4
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
5
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
6
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
7
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
8
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
9
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
10
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
11
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
12
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
13
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
14
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
15
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
16
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
17
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
18
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
19
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
20
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
Daily Top 2Weekly Top 5

धैर्यशिलांचे ‘कदम’ काँगे्रसपासून दूर ! : कारण-राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:02 IST

मतदार संघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो; पण गत 5 वर्षांत मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांनी येथे बरीच मशागत केली आहे, त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होणार निश्चित.

ठळक मुद्देपक्षाकडे उमेदवारीची मागणीच नाही; सर्वच पक्षांची तयारी सुरू

प्रमोद सुकरे ।क-हाड : विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या वेगाने वाहू लागले आहेत. कºहाड उत्तरही त्याला अपवाद नाही. सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. मात्र, गतवेळी काँग्रेसमधून लढलेल्या धैर्यशिलांचे ‘कदम’ सध्या पक्षापासून दूर दिसताहेत. या मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडे त्यांनी उमेदवारीच मागितलेली नाही. त्यामुळे कदमांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

क-हाड उत्तरमधील गत विधानसभेची निवडणूक ही तिरंगी झाली होती. त्यात राष्ट्रवादीच्या बाळासाहेब पाटलांकडून धैर्यशील कदम पराभूत झाले असले तरी त्यांना दोन नंबरची मते मिळाली होती. तर त्यावेळचे स्वाभिमानीचे उमेदवार मनोज घोरपडे तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यानंतर पराभवाने खचून न जाता धैर्यशील कदमांनी पुढच्या लढाईची तयारी सुरू केली.वर्धन अ‍ॅग्रोची उभारणी करत मतदार संघात कार्यकर्त्यांचे जाळे अधिक मजबूत केले आहे. त्यामुळे उत्तरच्या मैदानात ते शड्डू ठोकणार हे नक्की ? पण त्यांनी पक्षाकडे उमेदवारीच न मागितल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

मतदार संघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला  जातो; पण गत पाच वर्षांत मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांनी येथे बरीच मशागत केली आहे, त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होणार निश्चित आहे. आता ही निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार? कोण-कोणत्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणार? यावर बºयाच गोष्टी अवलंबून आहेत.

सध्या जिल्ह्यात काँग्रेसची वाट अवघड बनली आहे. कºहाड दक्षिण व माण मतदारसंघ वगळता पक्षाचा कुठेही आमदार नाही. अशा परिस्थितीत कºहाड उत्तरमधून गतवेळी दोन नंबरवर असणाºया कदमांनी उमेदवारीच मागितलेली नाही, याची चर्चा तर होणारच ! तसेच या मतदार संघातून जिल्हा परिषदेचे सदस्य भीमराव पाटील आणि अजित पाटील-चिखलीकर यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

जिल्ह्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचा प्रभाव जादा आहे. सध्या दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचे वारे सुरू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यात नेमक्या काय वाटाघाटी होणार, यावरच इच्छुकांचे भवितव्य अवलंबून आहे.शिवसेना प्रवेशाच्या चर्चा...काँग्रेसमधून उमेदवारीच मिळणार नसल्याने धैर्यशील कदम यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. भाजप-शिवसेना युतीत उत्तर विधानसभा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला आहे. कदम ऐनवेळी सेनेत प्रवेश करतील व धनुष्यबाण घेऊन मैदानात उतरतील, अशी अटकळ बांधली जात आहे.

पृथ्वीराज का उदयसिंहांना काँग्रेसचा ‘हात’...कºहाड दक्षिण मतदार संघातून काँग्रेसकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. दक्षिणेतून लढण्यासाठी दोघांचीही तयारी आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी पृथ्वीराज की उदयसिंहांना काँग्रेसचा हात देणार, याची चर्चा आहे. सध्यातरी उदयसिंह यांनी काँग्रेसला पहिली पसंती दिलेली दिसते. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना विराम मिळाला आहे. आता हा पूर्ण आहे की अल्पविराम, हे पाहण्यासाठी थोडी प्रतीक्षाच करावी लागेल.

पाटण विधानसभा मतदार संघातून काँग्रेसकडे हिंदुराव पाटील व नरेश देसाई या दोघांनी उमेदवारी मागितली आहे. येथे सध्या शिवसेनेचे शंभूराज देसाई आमदार आहेत. तर आघाडीत मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. त्यामुळे आघाडीतील नेत्यांची चर्चा व भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीला आघाडी होती. तशीच विधानसभेलाही राहणार आहे. मग कºहाड उत्तर मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला जातो. अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागून काय करायचे ? उमेदवारी मागूनही मिळणार नसेल तर कशाला मागायची? अशा भावनेतूनच मी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केलेली नाही.- धैर्यशील कदम, चेअरमन, वर्धन अ‍ॅग्रो. लि.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण