शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या थंडीनं सातारकर गारठले, पारा १६ अंशावर : धुक्यामुळं महामार्गावर संथ वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 17:16 IST

साताऱ्यासह जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने थंडीचे प्रमाण कमी झाले. त्यात शुक्रवारी रात्रीपासून पारा अचानक घसरला. शनिवारी सकाळी पारा सरासरी सोळा अंशावर घसरला होता. कडाक्याच्या थंडीमुळे सातारकर गारठले आहेत. महामार्गावर दाट धुके पडलेले असल्याने वाहनचालकांना काही अंतरावरचेही दिसत नव्हते. त्यामुळे संथगतीने वाहने धावत होती.

ठळक मुद्देपारा सरासरी सोळा अंशावर घसरला कडाक्याच्या थंडीमुळे सातारकर गारठले तापमानात शुक्रवारी रात्रीपासून मोठा बदलधुक्यामुळं महामार्गावर संथ वाहतूक

सातारा : साताऱ्यासह जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने थंडीचे प्रमाण कमी झाले. त्यात शुक्रवारी रात्रीपासून पारा अचानक घसरला. शनिवारी सकाळी पारा सरासरी सोळा अंशावर घसरला होता. कडाक्याच्या थंडीमुळे सातारकर गारठले आहेत.चक्रीवादळामुळे चार दिवसांपूर्वी साताऱ्यात पाऊस झाला होता. त्यानंतर ढगाळ वातावरण तयार झाल्याने थंडी गायब झाली होती. दरम्यानच्या काळात सकाळी पावसाचा शिंतोडा, दुपारी कडक ऊन तर रात्री थंडी असे तिन्ही ॠतू अनुभवण्याची वेळ सातारकरांवर आली होती.शहरातील तापमानात शुक्रवारी रात्रीपासून मोठा बदल झाला. अचानक थंडीचे प्रमाण वाढले. शनिवारी पहाटे कडक थंडी पडली होती. त्यातच सकाळची शाळा असल्याने उपस्थितीवर परिणाम जाणवत होता. या थंडीतही फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत फरक पडला नाही. महामार्गावर दाट धुके पडलेले असल्याने वाहनचालकांना काही अंतरावरचेही दिसत नव्हते. त्यामुळे संथगतीने वाहने धावत होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा