नाशिकचे किमान तपमान १७.७ अंशावर तरी नाशिककरांना सहा तासांपासून भरली हुडहुडी; ‘ओखी’च्या प्रभावामुळे हवेत कमालीचा गारठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 01:49 PM2017-12-05T13:49:00+5:302017-12-05T14:51:30+5:30

अहमदनगर, नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे, नंदूरबार आदि जिल्हे प्रभावीत झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी पहाटेपासूनच वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. नाशिकमध्ये पहाटेपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला असून हवेत कमालीचा गारवा जाणवत आहे.

 Nashik's minimum temperature is 17.7 degrees; The impact of the 'Okhi' is a big hole in the air! | नाशिकचे किमान तपमान १७.७ अंशावर तरी नाशिककरांना सहा तासांपासून भरली हुडहुडी; ‘ओखी’च्या प्रभावामुळे हवेत कमालीचा गारठा!

नाशिकचे किमान तपमान १७.७ अंशावर तरी नाशिककरांना सहा तासांपासून भरली हुडहुडी; ‘ओखी’च्या प्रभावामुळे हवेत कमालीचा गारठा!

Next
ठळक मुद्देदक्षिण भारताच्या किनारपट्टीवरून पुढे सरकत ‘ओखी’ गुजरातमध्ये पोहचलाउत्तर महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा १७ अंशाच्या पुढे किमान तपमानाचा पारा, नाशिककर सध्या कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत आहेत. पहाटेपासून शहरात मळभ दाटले असून रिमझिम पावसाबररोबरच हवेत प्रचंड गारवा

नाशिक : नाशिकचे किमान तपमानात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. १४ अंशावरून पारा थेट १७ अंशाच्या पुढे गेला आहे. एकूणच किमान तपमानात वाढ होताना दिसत असली तरी नाशिककर मंगळवारी पहाटेपासूनच गारठले आहे. कारण ‘ओखी’ वादळ गुजरातमध्ये धडकल्यामुळे नाशिकवरही त्याचा मोठा प्रभाव जाणवू लागला आहे. पहाटेपासून शहरात मळभ दाटले असून रिमझिम पावसाबररोबरच हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आहे.
दक्षिण भारताच्या किनारपट्टीवरून पुढे सरकत ‘ओखी’ गुजरातमध्ये पोहचला आहे. यामुळे अहमदनगर, नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे, नंदूरबार आदि जिल्हे प्रभावीत झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी पहाटेपासूनच वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. नाशिकमध्ये पहाटेपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला असून हवेत कमालीचा गारवा जाणवत आहे. यामुळे जनजीवन प्रभावीत झाले आहे. नाशिककरांना रेनकोटसोबत उबदार कपड्यांचाही आज वापर करावा लागत आहे. दैनंदिन कामासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. उबदार कपड्यांसह रेनकोट परिधान करुन दुचाकीवरून महिला-पुरूष नोकरदार वर्ग मार्गस्थ होताना दिसून आले. एकूणच १७ अंशाच्या पुढे किमान तपमानाचा पारा असतानाही नाशिककर सध्या कडाक्याच्या थंडीचा अनुभव काही तासांपासून घेत आहेत. कारण ‘ओखी’ मुंबईपासून पश्चिमेला ३०० किलोमीटर आणि सुरतेपासून दक्षिणेला ४८० किलोमीटरवरून पुढे वेगाने सरकत असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तर महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा सुटल्याने समुद्र खवळला असून मासेमा-यांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

ढगाळ हवामानामुळे किमान तपमानात वाढ होत असून दक्षिण भारताला तडाखा दिलेल्या ‘ओखी’ वादळाचा हा परिणाम असण्याची शक्यता हवामान निरिक्षण केंद्राकडून वर्तविली जात आहे. कारण दोन दिवसांपुर्वी शहराचे हवामान उत्तम होते. थंडीची तीव्रताही जाणवत होती आणि सुर्यप्रकाशही पडत होता; मात्र अचानकपणे रविवारपासून वातावरणात कमालीचा बदल होऊन ढग दाटण्यास सुरुवात झाली. सोमवारी (दि.४) पहाटेपासून थंडीचा कडाका कमी झाला होता. १६.१ इतके जास्त किमान तपमान नोंदविले गेले.

Web Title:  Nashik's minimum temperature is 17.7 degrees; The impact of the 'Okhi' is a big hole in the air!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.