कबड्डी स्पर्धेत घोडेगिरी संघ प्रथम

By Admin | Updated: January 17, 2015 00:09 IST2015-01-16T21:07:11+5:302015-01-17T00:09:09+5:30

वडगाव हवेलीत स्पर्धेला प्रतिसाद : सातारा, सांगलीसह कोल्हापूरच्या संघांचा सहभाग

Kabaddi Tournament Horse Team First | कबड्डी स्पर्धेत घोडेगिरी संघ प्रथम

कबड्डी स्पर्धेत घोडेगिरी संघ प्रथम

वडगाव हवेली : यशवंतराव चव्हाण युवक मंडळाने घेतलेल्या एकदिवसीय कबड्डी स्पर्धेत शिरोली कोल्हापूर येथील घोडेगिरी संघाने प्रथम क्रमांक पटकावला़ स्पर्धेत सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ३४ संघांनी सहभाग नोंदवला होता़ विजेत्या संघांना रोख बक्षिस व कायम शिल्ड देऊन गौरविण्यात आले़ कऱ्हाड जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर, दयानंद पाटील, सरपंच शंकर ठावरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले़ यावेळी सांगली जिल्हा राष्ट्रवादीचे शरद लाड, जगदीश जगताप, जयवंत जगताप, उपसरपंच संतोष जगताप, शिवाजीराव जाधव, पोपटराव जगताप, श्रीरंग साळुंखे, वडगाव हवेली विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष भानुदास जगताप, संचालक जे़ के़ जगताप, सदस्य अशोकराव जगताप, धनंजय जगताप, सिध्देश्वर पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ जगताप, सिध्देश्वर दूध संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जगताप, उपाध्यक्ष प्रशांत जगताप, सत्यवान जगताप उपस्थित होते़ स्पर्धेत शिरोलीतील घोडेगिरी संघाने प्रथम, सर्वेश्वर मंडळाने द्वितीय, कासेगाव येथील शिवगर्जना संघाने तृतीय तर शिरोली येथील नवभारत संघाने चौथा क्रमांक पटकावला़ विजेत्यांना अनुक्रमे ११ हजार एक, ९ हजार एक, ७ हजार एक, ५ हजार एक व शिल्ड देण्यात आले़ घोडेगिरी संघातील राकेश संपकाळ याने उत्कृष्ठ चढाईपटूचा बहुमान मिळवला़ सर्वेश्वरच्या संतोष मोरे उत्कृष्ठ पकडपटू ठरला़ त्यांना प्रत्येकी १ हजार रूपयांची बक्षिसे देण्यात आली़ सत्यवान जगताप, अशोकराव जगताप, विकास जगताप यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले़ निवास पाटील, दिग्विजय पाटील, महेश निकम, विकास कदम यांनी पंच म्हणून काम पाहिले़ शिवाजी जगताप व अशोकराव जगताप यांनी सूत्रसंचालन केले़ (वार्ताहर)

Web Title: Kabaddi Tournament Horse Team First

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.