शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

कास तलावाला कचऱ्याचा विळखा!, पार्ट्या, घाणीच्या साम्राज्याने निसर्गसौंदर्याला बाधा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 15:52 IST

पोलिसांची नजर असणे अत्यावश्यक 

सागर चव्हाण पेट्री : निसर्गाचे वरदान लाभलेल्या कास तलाव परिसरात ठिकठिकाणी अस्ताव्यस्त पडलेला कचरा पाहता तलाव कचऱ्याच्या विळख्यात पडलेला पाहायला मिळत आहे. पर्यटनस्थळी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घाणीच्या साम्राज्याने निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी निराशा व्यक्त करत आहेत.मद्याच्या बाटल्या, पिशव्या, कागदी बोळ्यांनी कास परिसर अस्वच्छ बनला असून, ठिकठिकाणी चुली माडण्यात आल्या आहेत. पर्यटक ठिकठिकाणी व्हेज, नॉनव्हेज पार्ट्या झोडत असून, होणारा कचरा त्याच ठिकाणी टाकत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरत आहे. कचऱ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊन भविष्यात कास तलावाचे निसर्गसौंदर्य हरवून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कासच्या सौंदर्याची भुरळ जिल्हा-परजिल्ह्यातील पर्यटकांना पडलेली आहे. पर्यटनास आलेल्या प्रत्येक पर्यटकांनी आपली मानसिकता बदलून कास तलाव स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. सध्या कास तलावावर बहुसंख्य पर्यटक गर्दी करत असून, वाढत चाललेल्या अस्वच्छपणामुळे पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमीतून नाराजीचे सूर उमटत आहेत.पोलिसांची नजर असणे अत्यावश्यक तलाव परिसरात मद्याच्या बाटल्यांचा खच पाहता राजरोसपणे मद्यपान होत असल्याचे चित्र आहे. डोक्यात नशा ठेवून चेष्टामस्करीचे रुपांतर भांडणात होऊन कोणतीही विपरीत घटना घडू नये, यासाठी पोलिसांची कायम करडी नजर असणे अत्यावश्यक आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठार