आठ दिवसांत ३१ तास मंगला जेधेंशी ज्योतीचा संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:20 IST2021-02-05T09:20:29+5:302021-02-05T09:20:29+5:30

सातारा : वाई हत्याकांड प्रकरणात मृत मंगल जेधे व माफीची साक्षीदार ज्योती मांढरे या दोघींमध्ये आठ दिवसांत तब्बल ३१ ...

Jyoti interacts with Jedhe for 31 hours in eight days | आठ दिवसांत ३१ तास मंगला जेधेंशी ज्योतीचा संवाद

आठ दिवसांत ३१ तास मंगला जेधेंशी ज्योतीचा संवाद

सातारा : वाई हत्याकांड प्रकरणात मृत मंगल जेधे व माफीची साक्षीदार ज्योती मांढरे या दोघींमध्ये आठ दिवसांत तब्बल ३१ तास बातचीत झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोळ यांना जेलमधून अर्ज न करता थेट वकिलांच्या माध्यमातून कोर्टापुढे तक्रारी मांडा, असे न्यायाधीशांनी बजावले.

जिल्हा न्यायालयात वाई हत्याकांडाची सुनावणी सुरू आहे. गुरुवारी नियमित याची सुनावणी सुरू होती. कथित डॉ. संतोष पोळ जेलमधून वारंवार तक्रार अर्ज करत असल्याने न्यायाधीशांनी त्याबाबत सुनावले. प्रत्येक सुनावणीसाठी तुम्हाला साताऱ्यात आणले जाते. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगही होते. अशावेळी तुम्ही तक्रार करत नाही. जेलमधून मात्र तक्रार अर्ज करत असता. आता इथून पुढे तुम्ही थेट वकिलांच्या माध्यमातून तक्रार द्या, असे न्यायाधीशांनी सुनावले.

दरम्यान, गुरुवारी उलट तपासामध्ये मंगल जेधे व माफीची साक्षीदार यांचे आठ दिवसांत तब्बल ३१ तास फोनवर बोलणे झाल्याचे समोर आले. याबाबत पोलिसांनी जे सीडीआर दाखल केले त्यातून ही बाब समोर आली. याशिवाय मेसेज झाल्याचेही न्यायालयात समोर आले. यावेळी विशेेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, संशयित आरोपी डॉ. सतोष पोळ, माफीची साक्षीदार ज्योती मांढरे, बचाव पक्षाचे वकील न्यायालयात उपस्थित होते. आज, शुक्रवारी पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Web Title: Jyoti interacts with Jedhe for 31 hours in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.